Download App

IOCL Recruitment : इंडियन ऑईलमध्ये 473 पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड पक्रिया

  • Written By: Last Updated:

IOCL Apprentice Recruitment 2024 : आज अनेकजण चांगली नोकरी (Job) मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, स्पर्धा इतकी आहे, मनासारखी नोकरी मिळवणं शक्य होत नाही. दरम्यान, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटे (IOCL) ने शिकाऊ उमदेवारांसाठी रिक्त जागा भरणार असल्याचं जाहीर केलं. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2024 आहे.

Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच 

या भरती मोहिमेअंतर्गत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एकूण 473 शिकाऊ पदे भरणार आहे. लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल.

अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 जानेवारी 2024 पर्यंत किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. इतर मागासवर्गीय (OBC-Non Creamy Layer) 3 वर्ष सूट, SC/ST- 5 वर्ष सूट.

महत्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 (PM 6)

प्रवेशपत्र डाउनलोड तारीख: 9 फेब्रुवारी 2024 (सायंकाळी 5 वाजता) ते 18 फेब्रुवारी 2014 (सायंकाळी ८ पर्यंत)

लेखी परीक्षा आयोजित करण्याची तारीख (तात्पुरती): 18 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या आधारे शिकाऊ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. संस्था लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरूपात घेईल. एका प्रश्नाला चार पर्याय असतील, त्यापैकी उमेदवाराला योग्य पर्याय निवडावा लागेल. परीक्षेच्या पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर लेखी परीक्षेत एकूण 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी, उमेदवारांना 1 गुण दिला जाईल. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

अधिकृत सूचना –

Click to access fc443547757e4e70a59c9a7ee22c5025.pdf

इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्वाची माहिती –

अर्ज करण्यापूर्वी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली अधिकृत जाहिरात वाचणे महत्त्वाचे आहे.
उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती सोबत बाळगणे आवश्यक आहे.

अर्ज कसा कराल?
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– फी भरा.

follow us