IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑईलमध्ये 1820 पदांसाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज
IOCL Recruitment 2023 : आज अनेकजण चांगली नोकरी (Job) मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, स्पर्धा इतकी आहे, मनासारखी नोकरी मिळवणं शक्य होत नाही. दरम्यान तु्म्ही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) ने नुकतीच बंपर भरती जारी केली आहे. IOCL ने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिसच्या 1820 पदांसाठी ही भरती सुरू केली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आवेदन मागण्यात आले आहेत.
‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर
विशेष म्हणजे ही भरती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार आहे. जर तुम्हाला इंडियन ऑइलमधील या रिक्त पदांमध्ये स्वारस्य असेल तर इंडियन ऑइल iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या पद भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 डिसेंबरपासून सुरू झाली.
कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा देवाचा निर्णय नाही; महबुबा मुफ्तीची आगपाखड !
इंडियन ऑइलच्या या पदांसाठी ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. या ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि अधिसूचित पात्रता निकषांची पूर्तता करून उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
शैक्षणिक पात्रता –
इंडियन ऑइलच्या या पदांसाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असले पाहिजेत. यासोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा. तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी उमेदवारांनी अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तर, पदवीधर शिकाऊ पदासाठी उमेदवारांनी B.COM/BA/BBA/B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
इंडियन ऑइलमधील या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 16 डिसेंबरपासून सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख– 5 जानेवारी
कंपनीची अधिकृत वेबसाइट – https://iocl.com/
अर्ज कसा कराल?
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– फी भरा.