Download App

टॅटू काढताय मग, आताच सावध व्हा, ‘लिंफोमा’ कॅन्सरचा धोका; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क नुसार टॅटू इंक (शाई) मध्ये अत्यंत धोकादायक केमिकल असतात.

Tattoo Causes Cancer : आजकाल तरुणाईत टॅटू गोंदवून घेण्याची फॅशनच झाली आहे. भारताच्या तुलनेत विदेशांत प्रमाण जास्त आहे. युवकांत याची क्रेझ आहे. परंतु, हा टॅटूच अनेक आजारांना आमंत्रण देत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. टॅटू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत अत्यंत धोकादायक रसायने असतात याची माहिती समोर आली आहे. तसेच टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी सुई जर चांगली नसेल तर थेट रक्ताचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंटच्या अभ्यासकांनी हेलसिंकी विद्यापीठाबरोबर टॅटू इंकचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क नुसार टॅटू इंक (शाई) मध्ये अत्यंत धोकादायक केमिकल असतात. त्वचेच्या आत हे केमिकल धोकादायक ठरू शकतात.

जर्नल अॅनालिटिकल केमिस्ट्रीत प्रकाशित एक स्टडीनुसार टॅटूच्या शाईमध्ये अनेक धोकादायक केमिकल असतात. यामुळे त्वचा, किडनी आणि लिव्हरमध्ये इरिटेशन होऊ शकतात. इतकेच नाही तर यामुळे किडनी आणि नर्व्हस सिस्टीमला देखील नुकसान होऊ शकते.

एक्स्पर्टनुसार टॅटू शरीरावर काढण्यासाठी वापरण्यात येणारी नीडल बरोबर नसेल तर रक्तद्वारे फैलवणारे अनेक आजार होण्याचा धोका राहतो. यामुळे हिपॅटायटीस सी, एचआयव्ही एड्स, मेथिसिलीन प्रतिरोधी स्टाफिलोकोकस ऑरियस यांसारखे गंभीर आजार बळावण्याचा धोका असतो.

Photos : तुम्हाला ‘या’ मराठी अभिनेत्रींच्या टॅटूचा अर्थ माहितीय का? पाहा फोटो

मेडिकल न्यूज टुडेनुसार स्वीडनची लिंड युनिव्हर्सिटीचे रिसर्चरने टॅटूमुळे कॅन्सर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. सन 2007 ते 2017 या दहा वर्षांच्या काळात स्वीडिश नॅशनल कॅन्सर रजिस्टरचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 20 ते 60 वयोगटातील लोकांचा समावेश होता. या स्टडीमध्ये आढळून आले की टॅटू बनवणाऱ्या लोकांत टॅटू न बनवणाऱ्या लोकांच्या तुलनेत लिंफोमा कॅन्सरचा धोका 21 टक्के जास्त होता.

लिम्फोमा कॅन्सर म्हणजे काय

लिम्फोमा हा एक अतिशय जटील आणि गंभीर स्वरुपाचा रक्ताचा कॅन्सर आहे. लिम्फॅटिक प्रणालीवर आणि हानिकारक संक्रमण रोगांपासून लढण्याच्या शरीराच्या क्षमतेवर हल्ला करतो. लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्त पेशी असामान्यपणे वागू लागतात आणि अनियंत्रितपणे गुणाकार करू लागतात तेव्हा या प्रकारचा कॅन्सर होतो. रक्ताचा कॅन्सर धोकादायक आहे. या आजारांपासून बचाव करायचा असेल टॅटू काढण्याचा मोह टाळायलाच हवा.

सावधान! आताच ‘ही’ सवय बदला नाहीतर बहिरे होताल; आरोग्य मंत्रालयाचा इशारा, राज्यांना धाडले पत्र

follow us