Download App

Navratri 2023 : जाणून घ्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील आद्यपीठाबद्दल…

Navratri 2023 : नवरात्रोत्सव (Navratri 2023) आला की, भक्तांकडून घटस्थापना केली जाते, देवीचा जागर केला जातो, देवीच्या शक्ती पीठांकडे भाविकांची पावलं वळायला लागतात. त्यात देशभरात देवीची विविध शक्तीपीठ आहेत त्यात राज्यात देवीची साडेतीन शक्ती पीठ आहेत या शक्ती पीठांना मोठा मान आहे. कोणती आहेत ही देवीचा साडेतीन शक्ती पीठं? त्यांच्या अख्यायिका काय? जाणून घेऊ या नवत्रोत्सावात…

पहिलं शक्तीपीठ कोणत आहे?

आज आपण पाहणार आहोत देवीचं आद्य म्हणजे पहिलं शक्तीपीठ कोणत आहे? त्याचं महत्व आणि अख्यायिका काय? कोल्हापूरची आदीमाय महालक्ष्मी म्हणजे देवीच्या साडेतीन शक्ती पीठांतील पहिलं शक्तीपीठ या मंदीराच्या बांधकामावरून ते इ.स. 600 ते 700 मध्ये म्हणजे चालुक्यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे. तर मंदीराचे पहिलं बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्या अगोदर शिलाहार राजांनी सुमारे 8 व्या शतकात बांधले असल्याचेही बोलले जाते. कारण पुराणं, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र आणि काही कागदपत्र यावरून अंबाबाईच्या या मंदीराच्या पुरातन असण्याचे पुरावे मिळतात.

पुण्याच्या बदल्यात बारामती! अजितदादा-भाजपमधील डील चंद्रकांतदादांनी फोडली

असं सांगितलं जात की, कधी काळी मुघलांनी देवळाचा विध्वंस केला होता. त्यामुळे पुजाऱ्या अनेक वर्ष मूर्ती लपवून ठेवली होती. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत 1715 ते 1722 या काळात मंदीराचं जुर्णोद्धार झाला. तर महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे त्यामुळे समोर गरूडमंडपात विष्णुचं वाहन गरूडाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर काहीच असं देखील म्हणणं आहे की, महालक्ष्मी ही पार्वतीचं रूप आहे. कारण तिच्या 40 किलोंच्या दगडी मूर्ती जवळ दगडी सिंह आणि शिरावर शिवलिंग आहे. त्यावर शेषनाग आहे.

‘बाळासाहेब असते तर जोड्यानेच मारले असते’; पाकिस्तानी संघाच्या स्वागतावर राऊतांचा संताप

तर मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. गरूड मंडप, सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. तर मंडळी ही होती कोल्हापूरच्या अंबाबाईची अख्यायिका आणि महती यानंतर जाणून घेऊ पुढंच्या शक्तीपीठाबद्दल..

Tags

follow us