Download App

1.50 लाखांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याची सुवर्णसंधी, मिळतोय 40 हजारांचा डिस्काउंट

Oben Rorr Discount Offer  : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरसह (Electric Scooter) इलेक्ट्रिक बाइक्सची (Electric Bikes

  • Written By: Last Updated:

Oben Rorr Discount Offer  : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरसह (Electric Scooter) इलेक्ट्रिक बाइक्सची (Electric Bikes) मागणी देखील झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारात कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक्स लाँच होताना दिसत आहे.

यातच जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही आता 1.5 लाख रुपयांच्या इलेक्ट्रिक बाइकवर 40 हजारांचा डिस्काउंट  प्राप्त करू शकता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय इलेक्ट्रिक बाइक कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने एक शानदार ऑफर जाहीर केला आहे.

या ऑफरनुसार बाजारात एक वेगळी ओळख निर्माण करणारी इलेक्ट्रिक बाइक ओबेन रोर वर 40 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. भारतीय बाजारात कंपनीने ही मस्त बाइक 1.50 लाखात लाँच केली आहे मात्र आता या बाइकला खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 1.10 लाख रुपये मोजावे लागणार आहे. मात्र ही भन्नाट ऑफर काही खास ग्राहकांना मिळणार आहे.

Oben Rorr बद्दल जाणून घ्या

कंपनीकडून या बाइकमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहे. या बाइकमध्ये शक्तिशाली मोटर देण्यात आली आहे ज्यावर कंपनीकडून तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात येत आहे. या शक्तिशाली मोटरच्या मदतीने ही बाइक फक्त तीन सेकंदात 0-40 किमी वेगाने चालवता येते तसेच बाइकचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास आहे.

तुम्हाला या बाइकमध्ये 4.4 kWh क्षमतेची बॅटरी पाहायला मिळते. ही बॅटरी फक्त दोन तासात  80 टक्के चार्ज होते. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाइक फुल चार्जमध्ये  187 किलोमीटरपर्यंत अंतर कापते.

‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल

ड्रायव्हिंगसाठी इको, सिटी आणि हॅवॉक मोड देण्यात आले आहेत तसेच ग्राहकांना या बाइकमध्ये काही शानदार फीचर्स देखील देण्यात आले आहे. ज्यामध्ये  ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम, जिओ फेन्सिंग थेफ्ट प्रोटेक्शन, 200 एमएम ग्राउंड क्लीयरन्स, 230 एमएम वॉटर वेडिंग सारखे फीचर्स आहे तसेच अनेक ॲप कनेक्टेड फीचर्स देखील बाइकमध्ये देण्यात आले आहे. कंपनी बॅटरीवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटीही देते.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज