‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल

‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल

Rohit Pawar On Ajit Pawar  : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये अनेक मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष अजित पवारांवर (Ajit Pawar) भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसत आहे.

यातच आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये महायुतीमध्ये अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत आहे तसेच अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली आहे असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजपला याची जाणीव झाली आहे की महाविकास आघाडीच्या विरोधात दुहेरी लढतीमध्ये जनता आपल्याला पराभव करते त्यामुळे तिरंगी लढत झाली पाहिजे ज्यामुळे जनतेची मते विभागली जाते आणि त्याचा फायदा भाजपला होतो असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे त्यामुळेच निवडणुकीत  तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय म्हणून अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत आहे.

त्यामुळे सर्वात आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका त्यानंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.

मात्र भाजपचा पराभव अजित पवारांमुळे नाहीतर भाजपच्या शेतकरी आणि युवा विरोधी धोरणांमुळे झाला आहे. भाजप नेत्यांच्या  अहंकारामुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे त्यांचा पराभव झाला असल्याची टीका रोहित पवारांनी या ट्विटमध्ये केली आहे.

या ट्विटमध्ये पुढे रोहित पवार म्हणाले, त्यामुळेच अजित पवारांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही.  शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या,  मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला  धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही याची दाखल आता  चाणक्यांनी घ्यायला हवी. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमधून बाहेर काढण्याची मागणी काही भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून होत असल्याची चर्चा आहे तर काही दिवसांपूर्वी आरएसएसच्या मुखपत्रातून देखील अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून देखील महायुतीवर चारही बाजूने टीका होताना दिसत आहे.

कौटुंबिक जबाबदारीमुळे 10 पैकी 9 व्यावसायिकांना नवीन कौशल्ये शिकण्यात अडथळे, अहवालात मोठा खुलासा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज