period cycle disrupted due to summer? Know the reasons and solutions : उन्हाळा म्हटलं की घाम, थकवा आणि अस्वस्थता हे सगळं आलंच. पण अनेक महिलांसाठी हा ऋतू फक्त बाहेरच्या तापमानाचा त्रास देत नाही, तर शरीराच्या आतल्या नैसर्गिक चक्रावरही परिणाम करू शकतो. विशेषतः मासिक पाळीच्या वेळेमध्ये त्रासदायक बदल जाणवू शकतो. साधारणपणे पाळी नियमित आणि ठराविक चक्रात येते, पण कडक उन्हाळ्यात काही महिलांना पाळी लवकर येणे, उशिरा येणे किंवा रक्तस्राव कमी-जास्त होणे असे बदल दिसून येतात. तुम्हालाही हे बदल जाणवत आहेत का? चला तर जाणून घेऊ याची कारणं आणि उपाय…
तज्ज्ञांच्या मते, हे फक्त योगायोग नसून शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. तज्ज्ञ सांगतात की, वाढत्या तापमानाचा परिणाम फक्त श्वसन किंवा मूत्रसंस्थेपुरता मर्यादित राहत नाही, तर तो हार्मोन्सवरही होऊ शकतो. शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत घेतं आणि त्यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्सच्या संतुलनात बदल होऊ शकतो. हेच हार्मोन्स मासिक पाळीचं चक्र नियंत्रित करतात.
मोठी बातमी! बारामतीत पुन्हा विमान अपघात; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच कोसळलं
उन्हाळ्यात अनेक महिलांना पाळीच्या फ्लोमध्येही फरक जाणवतो. काही वेळा रक्तस्राव जास्त होतो, तर कधी खूपच कमी होतो. यामागे शरीरातील पाण्याची कमतरता हे एक मोठं कारण आहे. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होऊ शकतं आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तसेच उष्णतेमुळे गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरण प्रक्रियेतही बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलेला अनुभव वेगळा असू शकतो.
नाशिकनंतर NEET पेपर फुटीप्रकरणात पुणे कनेक्शन समोर; 15 लाखात विकला पेपर?
फक्त एवढंच नाही, तर उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता आणि ताण-तणावही वाढतो. डिहायड्रेशनमुळे पोटदुखी, कळा आणि अशक्तपणा अधिक जाणवू शकतो. उष्णतेमुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. यामुळे मूड स्विंग्स, चिडचिड, थकवा आणि भावनिक अस्थिरता अधिक वाढू शकते. त्यामुळे काही महिलांना या काळात पाळीदरम्यान अधिक त्रास जाणवतो.
अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचं निधन ; वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
झोपेवरही उन्हाचा परिणाम होतो. उकाड्यामुळे नीट झोप लागत नाही आणि झोप कमी झाल्यास हार्मोनल संतुलन आणखी बिघडू शकतं. अशा वेळी डोकेदुखी, मळमळ, अंगदुखी, बेचैनी यांसारखी पीएमएसची लक्षणं वाढू शकतात.
आणखी एक धक्का, सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; आजपासून लागू
म्हणून या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. टरबूज, खरबूज, काकडी यांसारखी पाण्याने भरपूर फळं खावीत. नारळपाणी, ताक यांसारखी पारंपरिक पेयं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. हलका आहार, कमी कॅफिन, पुरेशी झोप आणि हलका व्यायाम किंवा योग केल्यास शरीराचं संतुलन राखण्यास मदत होते.
एकंदरीत, उन्हाळा आणि मासिक पाळी यांचा संबंध असू शकतो. त्यामुळे पाळीत बदल जाणवत असतील तर घाबरण्याचं कारण नाही. मात्र हा बदल वारंवार होत असेल किंवा त्रास जास्त जाणवत असेल, तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
