Download App

देशातील टॉप कंपन्यांत काम करायचंय? मग ‘PM इंटर्नशिप’ करील मदत; जाणून घ्या डिटेल..

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी इंटर्नशिप व्हॅकन्सींची नोंद केली आहे.

PM Internship Scheme 2024 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर (PM Internship Scheme 2024) आतापर्यंत 193 कंपन्यांनी 90 हजार 800 पेक्षा जास्त इंटर्नशिप व्हॅकन्सींची नोंद केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या पोर्टलवर जुबीलेंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, मुथुट फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या 193 कंपन्यांनी त्यांच्याकडील जागांची माहिती दिली आहे.

Internship संधींची माहिती देण्यासाठी सरकारने 3 ऑक्टोबरपासून पोर्टल सुरू केले आहे. पायलट परियोजना अंतर्गत इंटर्नशिप कार्यक्रमाची सुरूवात 2 डिसेंबरपासून होणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास 1.25 लाख उमेदवारांना या योजनेत आणण्याचा सरकारचा विचार आहे.

ऊर्जा क्षेत्रात वाढत्या संधी

कॉर्पोरेट मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की पोर्टलवर टाकण्यात आलेल्या संधींची संख्या वाढून 90 हजार 849 इतकी झाली आहे. 24 विविध क्षेत्रांतील कंपन्यांतील ही संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक संधी तेल, गॅस एनर्जी क्षेत्रात आहे. यानंतर ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी, वाहन आणि बँकिंग, वित्तीय सेवांचा क्रमांक आहे. ऑपरेशन मॅनेजमेंट, प्रोडक्शन अँड मनफॅक्चरिंग, विक्री आण वाणिज्य यांच्यासह 20 पेक्षा जास्त क्षेत्रात internship ची संधी आहे. या संधी देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील 737 जिल्ह्यांत उपलब्ध आहे.

Living Planet Report : भारतीय अन्नपदार्थ जगात भारीचं; केंद्र सरकारच्या ‘मिशन मिलेट’ चीही प्रशंसा

बजेटमध्ये योजनेची घोषणा

केंद्रीय अर्थसंकलपात या योजनेची (Union Budget) घोषणा झाली होती. 21 ते 24 या वयोगटातील एक कोटी उमेदवारांच्या इंटर्नशिप करण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. या माध्यमातून उमेदवारांना रोजगार करण्याच्या पात्रतेचे होतील. योजनेनुसार इंटर्नला एक वर्षासाठी 5 हजार रुपये दरमहा मदत. तसेच सहा हजार रुपयांचे अनुदान एकच वेळी मिळेल.

कसा कराल अर्ज ?

सर्वात आधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या pminternship.mca.gov.in वर जावे लागेल.

यानंतर रजिस्टर लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

येथे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. नंतर सबमिटवर क्लिक करा.

उमेदवाने भरलेल्या माहितीच्या आधारे पोर्टलवर बायोडेटा जनरेट होईल.

नंतर लोकेशन, सेक्टर, फंक्शनल रोल आणि योग्यतेच्या आधारावर जास्तीत जास्त पाच इंटर्नशिपसाठी अर्ज करावा लागेल.

यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करावे लागेल.

सर्वात शेवटी गरज म्हणून या अर्जाची एक  हार्ड कॉपी प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा

ALSO READ :

Government Schemes : स्टँड अप इंडिया योजनेतून नवउद्योजकांना 75 टक्के कर्ज अन् अनुदानही मिळणार?

Government Schemes : विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वापरासाठी अनुदान योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

Government Schemes : लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

follow us