Politics of Grain Roti Vs Rice : आपल्याकडे एक मोठा वाद कायम असतो – भात खायचा का पोळी (Roti Vs Rice) खायची? पण हा वाद फक्त आरोग्यावर नाही… तर त्यामागे आहे, आपल्या समाजाने केलेलं धान्याचं राजकारण. .. प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक (Devdutt Patnaik Post) म्हणतात, भात खाणाऱ्या प्रदेशातील बायका या… पोळी खाणाऱ्या प्रदेशातील बायकांपेक्षा जास्त शिकलेल्या आणि पर्यायाने जास्त स्वतंत्र असतात. चला तर मग, आज आपण उलगडून पाहूया – भात की पोळी? महिलांच्या स्वातंत्र्याचं (women’s freedom) खरं गणित काय?
देवदत्त पटनायक यांनी म्हटलंय की, उत्तर भारतातल्या बायका पोळ्या बनवण्यात अडकून पडल्या. गव्हाच्या पोळ्या बनवायला खूप वेळ जातो. दिवसभर ‘गरमागरम पोळी’ पुरुषांना द्यायची. त्यामुळे त्यांचा बराचसा वेळ स्वयंपाकघरातच जातो. शिक्षणासाठी, अभ्यासासाठी वेळच उरत नाही. पण दक्षिण भारतात काय होतं? तिथे भात हा मुख्य आहार. भात शिजवायला वेळ लागत नाही. एकदा ठेवला की तो आपोआप गरम राहतो. थोडं तूप घाला आणि खा. सोप्पं! त्यामुळे तिथल्या महिलांना शिक्षणासाठी, स्वतःसाठी वेळ मिळाला. म्हणूनच तिथे साक्षरता जास्त आहे.
ब्रेकिंग! सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित, पूरामुळे निवडणुकीची रणधुमाळी थांबली
पोळीने अडकवलं, भाताने स्वातंत्र्य दिलं?
प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांनी भारतातील धान्याच्या वापरावर आधारित स्त्रियांच्या जीवनशैली, शिक्षण आणि सामाजिक प्रथांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. त्यांनी ‘पॉलिटिक्स ऑफ ग्रेन’ म्हणजेच धान्याचं राजकारण या विषयावर लिहिताना उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील स्त्रियांची तुलना केलीय.
पटनायक यांच्या मते, दक्षिण भारतात भात हा मुख्य आहार आहे. भात शिजवण्यासाठी फार वेळ लागत नाही. एकदा भात शिजला , तो बराच वेळ गरम राहतो. सहज खाता येतो. त्यामुळे तिथल्या महिलांना स्वयंपाकघरात बांधून ठेवणं आवश्यक नसतं. यामुळे अभ्यासासाठी त्यांना अधिक वेळ मिळतो. याचाच परिणाम साक्षरतेत दिसतो. याउलट, उत्तर भारतात गव्हाच्या पोळ्या बनवण्याची परंपरा आहे. पोळी बनवणं हे जास्त कष्टाचं काम आहे. सतत पुरुषांना ‘गरमागरम पोळी’ द्यावी लागते, त्यामुळे स्त्रियांना दिवसभर स्वयंपाकघरात राहावं लागतं. यामुळे त्यांच्या शिक्षणावर आणि वेळेच्या व्यवस्थापनावर परिणाम होतो.
स्वयंपाकघरातून स्त्रियांचं नियंत्रण
गहू आणि बाजरी ही धान्यं पश्चिम आशिया, आफ्रिका, चीनमधून आली. पण त्यांना तयार करणं, लाटणं, भाजणं – हा सगळा त्रास स्त्रियांवर टाकण्यात आला. म्हणजेच स्त्रियांवर नियंत्रण.. याउलट भात मात्र आग्नेय आशियातून आला. पटकन शिजतो, पटकन खाता येतो. अगदी पुरुषही शिजवू शकतात. पण पोळी? पुरुष बनवतात, तर नेहमी वाकडी-तिकडीच होते! मॅगी नूडल्स सुद्धा खरं तर भात शिजवण्याच्या पद्धतीला दिलेली सलामी आहे, पोळीला नाही.
त्यांनी अगदी विनोदी शैलीत सांगितलं की… पुरुष भात सहज शिजवू शकतात, पण पोळ्या बनवल्या तर नेहमी वाकड्या-तिकड्याच होतात. मॅगी नूडल्स हीसुद्धा भात शिजवण्याच्या पद्धतीला दिलेली आधुनिक सलामी आहे, पोळीला नाही.
देशातील धान्याचं राजकारण
भात हा निसर्गाने दिलेलं इन्स्टंट फूड आहे. भातापासून लगेच तयार होणारे पदार्थ – इडली, डोसा – पटकन होतात. ज्यासाठी कमी श्रम, कमी नियंत्रण, कमी दडपशाही. त्यामुळेच भाताची पायसं देवांना अर्पण केली जाते. याउलट पोळी देवीला अर्पण केलं जातं. कारण या पोळी-प्रदेशांमध्ये जास्त अस्पृश्यता, दूधपान आणि ब्राह्मणवाद आढळतो. पुढे देवदत्त पटनायक असं म्हणतात की, जर कोणी म्हटलं की, भात खाल्ल्याने वजन वाढतं अन् पोळी खाल्ल्याने वजन कमी होतं. तर लक्षात ठेवा, हा फक्त आरोग्याचा मुद्दा नाही, तर आपल्या देशातील धान्याचं राजकारण आहे.
काही दिवसांपूर्वी देवदत्त पटनायक यांची एक पोस्ट वाचण्यात आली होती. त्यांनी असा सिद्धांत मांडला होता की भात खाणाऱ्या प्रदेशातील बायका या पोळी खाणाऱ्या प्रदेशातील बायकांपेक्षा जास्त शिकलेल्या आणि पर्यायाने जास्त स्वतंत्र असतात.
यावर प्राची सोमण असं म्हणतात की, हा युक्तिवाद सर्वतोपरी योग्य आहे असा माझा दावा नाही. स्त्रियांच्या शिक्षण व प्रगतीसाठी भात किंवा पोळी खाणे हे एकमेव कारण आहे, असेही मी मानत नाही. पण एक वेगळा विचार वाटला, थोडासा मनाला पटला म्हणून तुमच्या सर्वांचे पुढे मांडला.