Renault Duster अखेर भारतात लाँच: किंमत, फीचर्स अन् इंजिनची कामगिरी जाणून घ्या

Renault Duster : भारतीय बाजारात आज Renault ने नवीन एसयूव्ही Renault Duster मिड-साईज लाँच केली आहे. या कारमध्ये शानदार फीचर्ससह

Renault Duster

Renault Duster

Renault Duster : भारतीय बाजारात आज Renault ने नवीन एसयूव्ही Renault Duster मिड-साईज लाँच केली आहे. या कारमध्ये शानदार फीचर्ससह दमदार इंजिन देण्यात आले आहे. या दमदार कारसाठी कंपनीकडून बुकिंग जानेवारी 2026 मध्ये सुरु करण्यात आली आहे. 21 हजार रुपये भरुन तुम्ही देखील ही कार बुकिंग करु शकतात.

Renault Duster 2026 फीचर्स

नवीन Renault Duster ही ‘Renault Group Modular Platform’ (RGMP) वर आधारित आहे. मात्र यावेळी Duster मध्ये ‘4×4 ड्राइव्हट्रेन’चा पर्याय उपलब्ध नाही. नवीन Renault Duster अनेक फीचर्सने सुसज्ज आहे. या कारमध्ये 10.1-इंचाची ‘OpenR Link’ इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 60 हून अधिक ‘कनेक्टेड कार’ फीचर्स, 17 ‘Advanced Driver Assistance Systems’ (ADAS) फीचर्स , व्हेंटिलेटेड (ventilated) पुढील आसने, पॅनोरॅमिक सनरूफ, ‘डुअल-झोन’ ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ‘अँबियंट’ लायटिंग, ‘कार्बन फायबर’, फॉग लाईट्स, , 700 लिटर क्षमतेची ‘बूट स्पेस’, ‘इलेक्ट्रिक पॉवर टेलगेट’ आणि ‘ऑटो-होल्ड’ फंक्शनसह ‘Level-2 ADAS’, 35 हून अधिक सुरक्षा फीचर्स आणि सहा ‘एअरबॅग्ज’ देण्यात आले आहे.

Renault Duster 2026 इंजिन

Renault ने या SUV साठी इंजिनचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये 1.8-लिटर पेट्रोल E-Tech ‘स्ट्रॉंग-हायब्रिड’ इंजिन देण्यात आले आहे, जे 1.4 kWh क्षमतेच्या बॅटरीशी जोडलेले आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत असताना ही एसयूव्ही ‘EV मोड’मध्ये चालवणे शक्य होते.

दुसऱ्या इंजिन पर्यायाच्या स्वरूपात, यात नवीन ‘Turbo TCe 160’ इंजिन बसवण्यात आले आहे, जे 153 PS ची शक्ती आणि 280 Nm चा टॉर्क निर्माण करते.

तिसरा इंजिन पर्याय म्हणून ‘टर्बो-पेट्रोल’ इंजिन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही SUV ‘मॅन्युअल’ आणि ‘ऑटोमॅटिक’ अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि ती ‘ऑफ-रोडिंग’च्या बाबतीतही अत्यंत प्रभावी कामगिरी करते.

घसरणीनंतर शानदार कमबॅक; सेन्सेक्स 192 अंकांनी वधारला तर निफ्टी 23,400 च्या वर-

Renault Duste किंमत

Renault ने जाहीर केले आहे की, Duster ची ‘एक्स-शोरूम’ किंमत 10.49 लाखांपासून सुरू होईल. या एसयूव्हीच्या टॉप मॉडेल व्हेरिएंटची ‘एक्स-शोरूम’ किंमत 18.49 लाख इतकी आहे. भारतीय बाजारात ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, होंडा एलिव्हेट आणि स्कोडा कुशाक यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करणार आहे.

Exit mobile version