SBI UPI : देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, उद्या 22 जुलैरोजी एसबीआयचा यूपीआय (SBI UPI) काही तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात ग्राहकांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. एसबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही मेंनटनेंस कामासाठी 22 जुलैच्या रात्री युपीआय सर्व्हिस बंद राहणार आहे. याबाबत एसबीआयकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलैला 2025 रोजी यूपीआय सर्व्हिस काही काळासाठी खंडित राहणार आहे. हा व्यत्यय नियोजित मेंनटनेंस कामामुळे असेल. या काळात यूपीआय सेवा रात्री 12.15 पासून रात्री 1 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याचा अर्थ असा की, एसबीआय ग्राहक जुलैला 45 मिनिटांसाठी यूपीआय सर्व्हिस वापरु शकणार नाही. मात्र या दरम्यान ग्राहक यूपीआय लाईट (UPI Lite) वापरु शकणार आहे. तसेच एसबीआयने गैरसोयीबद्दल आपल्या ग्राहकांची माफी मागितली आहे आणि म्हटले आहे की ते शक्य तितक्या लवकर सेवा सामान्य करण्याचा प्रयत्न करतील.
Due to scheduled maintenance activity, SBI UPI services will be temporarily unavailable from 00:15 hrs to 01:00 hrs on 22.07.2025 (IST).
Customers may continue to use UPI Lite Services for uninterrupted service.
We regret the inconvenience caused to our customers.
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 20, 2025
UPI Lite कसे अक्टिव्ह करावे?
यासाठी तुम्हाला SBI चे BHIM SBI Pay ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप उघडल्यानंतर, तुम्हाला UPI Lite विभागात जावे लागेल. तेथे तुम्हाला तुमच्या UPI Lite खात्यात पैसे लोड करण्याचा पर्याय मिळेल. एकदा तुम्ही निधी लोड केला की, तुमचा UPI Lite अक्टिव्ह होईल आणि तुम्ही ते लहान व्यवहारांसाठी वापरू शकाल.
क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एसबीआय वेबसाइटनुसार, तुम्ही तुमच्या यूपीआय लाईट खात्यात एका वेळी जास्तीत जास्त 2000 रुपये लोड करू शकता. याशिवाय, तुम्ही प्रत्येक व्यवहारात जास्तीत जास्त 500 रुपये पेमेंट करू शकता. एका दिवसात, तुम्ही यूपीआय लाईटद्वारे एकूण 4000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. तसेच, तुमच्या यूपीआय लाईट खात्यात कधीही कमाल शिल्लक फक्त 2000 रुपये असू शकते.