Download App

आरबीआय व्याज दरात किती कपात करणार?, उद्या ग्राहकांना मिळणार आनंदवादर्ता?

देशभरातील ग्राहकांसाठी आनंदवार्ता? असा सवाल करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जाचा हप्ता सातत्याने कमी कमी होत आहे.

  • Written By: Last Updated:

RBI Monetary Policy : मागच्या जुलै महिन्यातील महागाईच्या आकड्यांनी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीसमोर जून महिन्याचे महागाईचे आकडे आहेत. (RBI) जून महिन्यात किरकोळ महागाई जवळपास 77 महिन्यांच्या निच्चांकावर आली. आता आरबीआयसमोर व्याज दरात कपात करावी की नाही असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे व्याज दरात किती कपात करावी हा पण एक सवाल समोर आहे.

आरबीआयने जून महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने कपात केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात व्याज दरात 25-25 बेसिस पॉईंटची कपात केली. आरबीआयने या वर्षात रेपो दरात 6.50 टक्क्यांहून 5.50 टक्क्यांपर्यंत कपात केली. देशात महागाई दर 2 टक्क्यांवर आला आहे. आता ऑगस्ट महिन्यात व्याजदरात किती कपात करावी हा यक्ष प्रश्न आरबीआय आणि पतधोरण समितीपुढे आहे.

मोठी बातमी! UAN बाबतीत EPFO ने घेतला मोठा निर्णय; पहिल्या जॉबसोबत या कामाकडे दुर्लक्ष नको

6 ऑगस्ट म्हणजे उद्या आरबीआय गव्हर्नर आणि पतधोरण समितीचे अध्यक्ष त्याची घोषणा करतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अंदाजानुसार, आताही 25 टक्के बेसिस पॉईंटची कपात होऊ शकते. तर काहींच्या मते आता दुप्पट कपात होऊन, रेपो दर 5 टक्क्यांवर येऊ शकतो. असे झाले तर हा मास्टरस्ट्रोक असेल. SBI ने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 25 बेसिस पॉईंटची कपात करू शकते. जर आता रेपो दरात कपात झाली तर फेस्विव्ह सिझनासाठी त्याचा फायदा होईल. घर आणि कार विक्री वाढू शकते.

दिवाळी-दसऱ्यापर्यंत एक चांगले वातावरण राहील. ऑगस्ट 2017 मध्ये 25 आधार अंकांवरील कपातीमुळे दिवाळीच्या काळात 1956 अब्ज रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यास गृहकर्ज व्याज दरात मोठी कपात होईल आणि रिअल इस्टेट क्षेत्राल बुस्टर डोस मिळेल. या काळात घर खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.

follow us