Body Mass Index : जर तुमच्या शरीरात 23 पेक्षा जास्त बीएमआय (Body Mass Index) आहे तर तुम्ही लठ्ठपणाच्या आहारी जात आहात. ज्यामुळे भविष्यात अनेक आजार उद्भवू शकतात. संतुलित आहार आणि चांगली लाईफस्टाईल यांचा अंगीकार करून तुम्ही या संभाव्य आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. लठ्ठपणा भारतात (Obesity) एक सामान्य समस्या बनली आहे. या लठ्ठपणामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. नुकताच एक अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.
शरीरात लठ्ठपणासाठी बॉडी मास इंडेक्सचा वापर केला जातो. बॉडी मास इंडेक्स एखाद्या व्यक्तीचं वजन आणि उंची यांच्या आधारे काढण्यात येणारे माप असते. एखाद्या व्यक्तीचे वजन त्याच्या उंचीच्या प्रमाणात आहे किंवा नाही हे बीएमआयच्या मदतीने ठरवता येते.
जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात 23 पेक्षा जास्त बीएमआय असेल तर तो व्यक्ती लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत चालला आहे असे म्हणता येते. भारतात 15 वर्षानंतर लठ्ठपणा संदर्भात नवा अभ्यास समोर आला आहे. एम्स दिल्ली, डायबिटीस असोसिएशन आणि फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी हा अभ्यास केला आहे. 23 पेक्षा जास्त बीएमआय आरोग्यासाठी चांगला नाही असे या अभ्यासात म्हटले आहे. लठ्ठपणाशी संबंधित अन्य आजारांबाबतही हा अभ्यास करण्यात आला आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीस, हृदयरोग, हायपर टेन्शन यांसारखे आजार होऊ शकतात.
दिवाळीत हृदयाचं आरोग्य जपा; कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!
लठ्ठपणा आणि मधुमेहाचा अतिशय जवळचा संबंध आहे. टाईप 2 प्रकारचा मधुमेह लठ्ठपणामुळे होतो. लठ्ठपणामुळे शरीरात इन्सुलिन व्यवस्थितपणे तयार होत नाही. यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढत जाते आणि पोटाच्या आसपास चरबी जमा होते. शरीरात जमा होणारे फॅट मेटाबॉलिजम आणि इन्सुलिनच्या कामात अडथळा आणते. यामुळे मधुमेहाचा आजार होतो. सडपातळ लोकांच्या तुलनेत जाड व्यक्तींमध्ये मधुमेहाची समस्या जास्त आढळते. लठ्ठपणामुळे शरीरात सूज येण्याचाही धोका असतो. तसेच लठ्ठपणा पेंक्रियाजलाही प्रभावित करण्याचे काम करतो.
जर पोट आणि कमरेच्या आसपास चरबी जमा आहे तर अशा वेळी डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. ज्या व्यक्तीचा बीएमआय 25 पेक्षा जास्त असेल त्याला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करून डायबिटीसचा धोका कमी करता येईल.
खरंतर लठ्ठपणा शरीराचा शत्रूच आहे. पोटाच्या आसपास जमा होणाऱ्या चरबीमुळे उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेजचे कारण बनत. लठ्ठपणामुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वेगाने वाढत जातो. यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक कष्ट पडतात. लठ्ठपणामुळे रक्तवाहिन्यामध्ये प्लाक जमा होऊ लागतो. यामुळे रक्ताच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हार्ट अटॅक, हार्ट फेल्युरचा धोका वाढतो. लठ्ठ लोकांमध्ये हृदय रोगाचा धोका नेहमीच जास्त असतो.
Health Update : बसून काम करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय; चरबी घटवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
लठ्ठपणा तुमच्या मस्तिष्कसाठी देखील धोकादायक आहे. यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका अधिक वाढतो. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे मेंदू रक्त वाहिन्यांवर दबाव निर्माण होतो. रक्ताचा पुरवठा मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात झाला तर स्ट्रोक होण्याची समस्या वाढत जाते.
.