RBI Repo Rate : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) बुधवारी झालेल्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीत मोठा निर्णय घेत रेपो रेट (Repo Rateb कमी केला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईतून दिलासा मिळाला आहे. रेपो दरातील कपातीचा मध्यमवर्गीयांच्या खिशावर काय परिणाम होणार? याबाबत जाणून घ्या.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा एक व्याजदर आहे ज्यावर देशाची आरबीआय, व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज देते. जेव्हा आरबीआय हा व्याजदर कमी करते तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते. त्यानंतर बँकाही स्वस्त व्याजदराने कर्ज देऊ लागतात. त्यामुळे जर रेपो दर कमी केला तर गृहकर्ज, कार कर्ज, व्यावसायिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये दिलासा मिळू शकतो.
मध्यमवर्गीयांच्या खिशावर कसा परिणाम होतो?
जर आरबीआयने रेपो दर वाढवला तर बँकांना जास्त व्याजदराने कर्ज मिळेल. त्यानंतर बँका जास्त व्याजदर आणि ईएमआयवर कर्ज देतात. रेपो दरातील कपात मध्यमवर्गाच्या खिशावर कसा परिणाम करू शकते हे समजून घेऊया. तुम्ही बँकेकडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 8.70 टक्के व्याजदराने 30 वर्षांसाठी घेतले असेल, तर तुमचा सध्याचा ईएमआय 39,157 रुपये असू शकतो. मात्र जर रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी केला तर व्याजदर 8.45 टक्के होईल. त्यानंतर ईएमआय 38,269 रुपये होईल.
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर खासदार उदयनराजेंचा संताप, केली ‘ही’ मोठी मागणी
याचा अर्थ असा की तुम्ही दरमहा 888 रुपये वाचवाल आणि जर रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केला तर बँक कर्जाचा व्याजदर 8.20 टक्के होईल. बँक कर्जाच्या व्याजदरात कपात झाल्यामुळे, ईएमआय 37000 रुपयांवरून 36,388 रुपये होईल. म्हणजेच दरमहा सुमारे 1,769 रुपये वाचवता येतात.