What Is Sleep Divorce Trend In Young Couple : आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. पण जर तुमचा जोडीदार रात्रभर घोरत असेल, वळत असेल किंवा त्याच्या झोपण्याच्या सवयी (Health Tips) वेगवेगळ्या असतील, ज्यामुळे तुमची झोप कमी होत असेल तर? बरेच लोक त्यांच्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे खूप अस्वस्थ असतात. सकाळी चिडचिडेपणाने उठतात. दरम्यान अलिकडच्या काळात ‘स्लीप डिव्होर्स’ (Sleep Divorce) चा ट्रेंड वेगाने वाढतोय.
याचं प्रमाण विशेषतः तरुण जोडप्यांमध्ये (Young Couple) आणि वर्किंग प्रोफेशनल्समध्ये वाढताना दिसतेय. आज आपण स्लीप डिव्होर्स म्हणजे काय, ते कसे कार्य करते आणि ते स्वीकारताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, हे जाणून घेऊ या.
‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे काय?
स्लीप डिव्हॉर्सचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी ब्रेकअप करत आहात. याचा अर्थ असा आहे की, तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या बेडवर झोपता. जेणेकरून तुम्हाला दोघांनाही चांगली आणि संपूर्ण झोप (What Is Sleep Divorce) मिळते. अनेक जोडपी वेगवेगळे झोपण्याचा निर्णय घेतात, कारण त्यांच्या झोपेच्या सवयी जुळत नाहीत, कोणी घोरतो किंवा कोणाला वारंवार जागं होण्याची सवय असते.
चीनचा ट्रम्पला झटका; अमेरिकेच्या वस्तूंवर 34 टक्के ‘टॅरिफ’, अमेरिकेचे शेअर बाजार कोसळला
‘स्लीप डिव्होर्स’चा ट्रेंड का वाढतोय?
गेल्या काही वर्षांत लोक त्यांच्या मानसिक आरोग्याकडे आणि झोपेच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देत आहेत. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालंय की, चांगली झोप आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याशी थेट संबंधित (Sleep Divorce Trend) आहे. जर झोप पुरेशी नसेल तर नात्यांमध्ये चिडचिड, संघर्ष आणि तणाव वाढू शकतो. याच कारणामुळे अनेक तरुण जोडपी आता ‘स्लीप डिव्हॉर्स’ घेत आहेत.
स्लिप डिव्होर्समागे कोणती कारणे?
चांगल्या झोपेसाठी- जर एक जोडीदार झोपेत घोरतो किंवा खूप हालचाल करतो, तर दुसरा जोडीदार नीट झोपू शकत नाही. अशा परिस्थितीत, वेगळे झोपल्याने दोघांनाही चांगली आणि पूर्ण झोप मिळते.
नात्यातील ताण कमी होतो- चांगली झोप घेतल्यानंतर मूड चांगला राहतो, ज्यामुळे नात्यात प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. जेव्हा दोन्ही जोडीदार ताजेतवाने आणि आरामशीर वाटतात तेव्हा भांडणाची शक्यता देखील कमी होते.
शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’…साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान, मार्केट पडण्याचे प्रमुख 6 कारणे
वेगवेगळ्या झोपण्याच्या सवयी – बऱ्याचदा, जोडप्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेत खूप फरक असतो. काही लोकांना लवकर झोपण्याची सवय असते, तर काहींना फोन वापरण्याची किंवा रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय असते. अशा परिस्थितीत, वेगळे झोपणे दोघांसाठीही फायदेशीर आहे.
स्लीप डिव्होर्स कसा काम करतो?
स्लीप डिव्होर्स स्वीकारण्यासाठी, जोडपे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा एकाच खोलीत वेगवेगळ्या बेडवर झोपण्याचा निर्णय घेतात. ते पूर्णपणे त्यांच्या सोयी आणि सोईवर अवलंबून असते. अनेक जोडप्यांना असे आढळून येते की, ही संकल्पना स्वीकारल्यानंतर त्यांना अधिक उत्साही आणि आनंदी वाटते, ज्यामुळे त्यांचे नाते देखील सुधारते.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
स्लीप डिव्होर्स घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही. अचानक न बोलता वेगळे झोपण्याचा निर्णय घेतल्याने नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. दिवसभराच्या कामानंतर थोडा वेळ एकत्र घालवा, जेणेकरून नात्यातील उबदारपणा टिकून राहील. हे फक्त झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आहे. त्यामुळे भावनिक बंधनावर त्याचा परिणाम होऊ नये. जर तुम्हाला त्याची गरज नसेल, तर फक्त ट्रेंडसाठी स्लीप डिव्होर्स स्वीकारण्याची गरज नाही.