Download App

ट्रान्सजेंडर, गे… रक्तदान का करू शकत नाही, केंद्र सरकारने SC ला दिले स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

ट्रान्सजेंडर व्यक्ती, (Transgender) पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आणि महिला सेक्स वर्कर्स (sex workers) यांना रक्तदानापासून दूर ठेवण्यासाठी केंद्राने आपली रक्तदाता निवड मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. त्यात केंद्राने सांगितलं की, ट्रान्सजेंडर, सेक्स वर्क हे रक्तदान करू शकत नाहीत. याबाबत स्पष्टीकरण देतांना केंद्रानं म्हटलं की, एचआयव्ही, हिपॅटायटीस बी किंवा सी चा धोका असलेल्या व्यक्तींच्या श्रेणीत ट्रान्सजेंडर, एमएसएम आणि महिला सेक्स वर्कर यांचे वर्गीकरण करून त्यांना रक्तदाता मह्णून वगळणे हे वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे. रक्तदात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देणारं प्रतिज्ञापत्र याचिकेत दाखल करण्यात आले होते. या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दिलं.

लिंगभेदाच्या आधारावर रक्तदान करायला मनाई करणं हा भेदभाव असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्त्यांची त्यांची बाजू स्पष्ट करतांना सांगितलं होतं की, ब्लड डोनेट केल्यानंतर त्याची टेस्ट घेतली जाते. तेव्हा त्या रक्तात हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, शिवाय, HIV चा व्हायरस आहे का हे देखील तपासलं जातं. मग तरीही गे, ट्रांसजेंडर आणि सेक्स वर्कर लोकांवर रक्तदान करायला बंदी घालण्यामागचं नेमकं कारण काय?

दरम्यान, आता केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, गे आणि बाय-सेक्स्युअल पुरुष, ट्रान्सजेंडर आणि देहविकी करणाऱ्या स्त्रीया ह्या कधीच कधीच रक्तदान करू शकत नाहीत. कारण, या लोकांमध्ये एचआयव्ही आणि हेपिटायटीस-‘बी’ आणि ‘सी’ची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे इतर रुग्णांच्या जीवाला धोका संभवू शकतो.

पराभव रासनेंचा मात्र चंद्रकांतदादांसह पुणे भाजप पदाधिकाऱ्यांचं वाढलं टेन्शन… 

संक्रमणाच्या जोखमीमुळे उपचार योग्यरित्या केले जात नाहीत
या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्राथमिक प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू माडंली. सरकारने न्यायालयाला सांगितले की ट्रान्सजेंडर, सेक्स वर्कर्स उपेक्षित राहतात, कलंक आणि संक्रमणाचा धोका यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होते.

मंकी पॉक्सच्या बाबतीत MSM ला उच्च धोका
केंद्राने म्हटले आहे की, ट्रान्सजेंडर, एमएसएम आणि महिला सेक्सवर्कर यांचे गट समाजात उपेक्षित आहेत. त्यांच्यावर लागलेल्या कलंकामुळे त्यांना संसर्ग झाला असला तरीही वेळेवर उपचार घेणे कठीण होते. त्यामुळे या लोकसंख्येच्या गटातून संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढतो.

सुरक्षित रक्तदान करण्याचा उद्देश
केंद्राने पुढे म्हटले आहे की रक्तदात्याच्या अधिकारापेक्षा सुरक्षित रक्त प्राप्त करणार्‍याचा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे रक्तदात्यांना तुम्ही गे आहात का? असे प्रश्न विचारणं कठिण असतं. पण तरीही रक्तदात्याची योग्य माहिती असणंही तितकच गरजेचं आहे. कारण, सुरक्षित रक्त संक्रमण प्रणाली (BTS) चा उद्देश हा दान केलेले रक्त रक्त प्राप्त करणाऱ्याचे आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. सरकारने सांगितले की, रक्त घेणारा हा दुर्दैवी परिणामांपासून संरक्षित आहे, याची खात्री करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. केंद्राने सांगितलं की, देशातील रक्त संक्रमण प्रणाली (BTS) ही रक्तदानावर अवलंबून आहे. संपूर्ण देशभरात भिन्न असलेल्या आरोग्य प्रणालीच्या गुणवत्तेच्या संदर्भात विद्यमान वास्तविकता लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. त्यामुळे घटनात्मक न्यायालयांनी अशा प्रकारच्या यांचिकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

 

Tags

follow us