Download App

हर्षित राणासाठी ड्रीम डेब्यू, पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर केला अनोखा ‘विक्रम’!

Harshit Rana : भारत आणि इंग्लंड (IndvsEng) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट

  • Written By: Last Updated:

Harshit Rana : भारत आणि इंग्लंड (IndvsEng) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताकडून 2 खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) आणि फलंदाज यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

आपल्या पहिल्याच सामन्यात हर्षित राणाने शानदार कामगिरी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकात हर्षित राणाने 11 धावा दिल्या तर सहाव्या षटकात 26 धावा दिल्या. या षटकात फिलिप सॉल्टने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. याचबरोबर राणा त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला तर दहाव्या षटकात गोलंदाजी करताना बेन डकेट आणि हॅरी ब्रूकचे विकेट घेतले तर 36 व्या षटकात हर्षित राणाने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केला.

हार्षिदने या सामन्यात 3 विकेट घेऊन राणाने एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या सामन्यात 3 विकेट्स घेणारा हर्षित राणा हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

मजबुरीमुळे काँग्रेस ‘जय भीम’ चा नारा देत आहे अन् … PM मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

राणाने नोव्हेंबर 2024 मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 15.2 षटके टाकली आणि 48 धावा देत 3 बळी घेतले. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात राणाने 4 षटके गोलंदाजी केली आणि 33 धावा देत 3 बळी घेतले.

follow us