मजबुरीमुळे काँग्रेस ‘जय भीम’ चा नारा देत आहे अन् … PM मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

  • Written By: Published:
मजबुरीमुळे काँग्रेस ‘जय भीम’ चा नारा देत आहे अन् … PM मोदींचा राज्यसभेत हल्लाबोल

PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील (Parliament Budget Session) आभार प्रस्तावावरील चर्चेला राज्यसभेत आज उत्तर दिले . राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काॅंग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींचे भाषण प्रेरणादायी आणि प्रभावी होते. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या कामगिरी, जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा, भारतातील सामान्य माणसाचा आत्मविश्वास, भारताचा विकास करण्याचा संकल्प अशा सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. पण काँग्रेससाठी कुटुंब प्रथम येते, तर आमच्यासाठी राष्ट्र प्रथम येते. काँग्रेसकडून ‘सबका साथ, सबका विकास’ अशी अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल. हे त्यांच्या विचारांच्या पलीकडे आहे आणि ते त्यांच्या रोडमॅपशी सुसंगतही नाही, कारण संपूर्ण पक्ष फक्त एकाच कुटुंबाला समर्पित आहे. अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसवर केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘सबका साथ, सबका विकास’ ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच देशाने आपल्या सर्वांना येथे बसण्याची संधी दिली आहे. आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्यासाठी निवडल्याबद्दल मी राष्ट्राचा आभारी आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या आदर्शाने सातत्याने काम केले आहे. पाच-सहा दशकांपासून देशासाठी पर्यायी मॉडेल नव्हते. 2014 नंतर, देशाला प्रशासनाचे पर्यायी मॉडेल मिळाले आहे. हे नवीन मॉडेल समाधानावर लक्ष केंद्रित करते, तुष्टीकरणावर नाही. असं देखील मोदी म्हणाले.

काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करते

तसेच काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करते आणि हे सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे आहेत. काँग्रेसने दोनदा निवडणुकीत आंबेडकरांना पराभूत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी कधीही त्यांना भारतरत्न देण्याचा विचार केला नाही. या देशातील जनतेने बाबासाहेबांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर केला आहे. आज काँग्रेस नाराज आहे त्यामुळे त्यांना मजबूरीमुळे ‘जय भीम’ चा नारा द्यावा लागला आहे. असं देखील मोदी म्हणाल.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सबका साथ, सबका विकास या मंत्राने प्रेरित होऊन आमच्या सरकारने पहिल्यांदाच सामान्य श्रेणीतील गरिबांना 10 टक्के आरक्षण दिले. तेही कोणत्याही तणावाशिवाय आणि कोणाकडूनही हिसकावून न घेता दिले गेले. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा एससी-एसटी आणि ओबीसी समुदायांनीही त्याचे स्वागत केले.

Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

भारताच्या विकास प्रवासात महिला शक्तीचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. पण जर त्यांना संधी मिळाल्या आणि ते धोरणनिर्मितीचा भाग बनले तर देशाची प्रगती आणखी वेगवान होऊ शकते. म्हणून आम्ही या नवीन सभागृहाचा पहिला निर्णय म्हणून ‘नारी शक्ती कायदा’ मंजूर केला. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube