World Mental Health Day 2024 : जगभरात दरवर्षी जागतिक मानसिक स्वास्थ्य दिंन १० ऑक्टोबर रोजी (World Mental Health Day 2024) साजरा करण्यात येतो. सन १९९२ मध्ये वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. मानसिक आरोग्य बाबतीत जागरूकता वाढवणे आणि यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी मानसिक आरोग्य संबंधित विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. ऑस्ट्रेलिया आणि अन्य काही देशांत या निमित्त मानसिक आरोग्य सप्ताह आयोजित केला जातो.
प्रत्येक वर्षात नवीन थिमसह हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतात सन १९८२ मध्ये राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मानसिक आरोग्य सेवा विकसित करणे हा उद्देश यामागे होता. या सर्वेक्षणाने सन २०१६ मध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार भारतातील प्रत्येक २० व्यक्तींमध्ये एक जण मानसिक विकाराने ग्रस्त आहे.
भारतीय मानसिक स्वास्थ्य अधिनियम २०१७ कलम (२१) ४ a मध्ये तरतूद आहे की मानसिक आजार आणि शारीरिक आजार यांच्यात कोणताच भेदभाव राहणार नाही. प्रत्येक विमाधारक मानसिक आजारांच्या उपचारासाठी आरोग्य विम्याचा उपयोग त्याच पद्घतीने करेल ज्या पद्धतीने शारीरिक आजारांसाठी करतो. पण बहुतांश विमा कंपन्या मानसिक आजाराला आपल्या संरक्षण कवचातून बाहेर ठेवतात. त्यामुळे मानसिक आजार ग्रस्त रुग्णांना विम्याचा फायदा मिळत नाही.
Mental problems : देशात आता मानसिक आरोग्य तपासणी: कोविडने वाढली समस्या?
१० ऑक्टोबर १९९२ रोजी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थचे उप महासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकारातून या दिवसाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीची काही वर्षे या दिवसाचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे आणि त्यांना शिक्षित करणे असा होता. नंतर १९९४ पासून प्रत्येक वर्षी महासचिव युजीन ब्रॉडी यांच्या शिफरशीनुसार या दिवसाला नवीन थीम घेऊन साजरा करण्यात येऊ लागले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार सन 2019 मध्ये 97 लाखांपेक्षा जास्त लोक मानसिक विकरांनी ग्रस्त होते. प्रत्येक सहा व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मानसिक आजाराने पीडित आहे. तज्ज्ञांच्या मते कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांत मानसिक आजारांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. 50 टक्के लोकसंख्येला त्यांच्या जीवनकाळात मानसिक विकारांचा धोका असतो.
एक तृतीयांश अमेरिकी लोकांचे म्हणणे आहे की कामाचं टेन्शन आणि वर्कप्लेसशी संबंधित समस्यांमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 80 टक्के लोक कामा दरम्यान मानसिक तणावाचा सामना करतात.
Bank Employee Agitation : कामाचा ताण वाढला; बँक कर्मचाऱ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार…