Download App

१५ वर्षात काय कामे केली, त्यांना विकास निधीही आणता आला नाही; अजित पवारांची सुळेंवर निशाणा

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Supriya sule : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारातमीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत, तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून एकमेंकावर सातत्याने टीका केला जाते. आताही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

नकली शिवसेना, राष्ट्रवादी महाराष्ट्राचे भले करतील का? अमित शाहांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल 

सासवडमध्ये आज महायुतीचा शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला संबोधित करतांना अजित पवार म्हणाले, ज्यांना तुम्ही खासदार म्हणून पंधरा वर्ष निवडून दिलं, त्यांनी काय कामे केली? केवळ भाषणं करून विकास होत नसतो. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगती करत आहे. मात्र, काहींना विरोध केल्यानं त्यांना विकास निधी आणता आला नाही, अशी टीका अजित पवारांनी केली. आता महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर त्यांच्यापेक्षा जास्त विकासकामे करेल आणि त्यासाठी केंद्रातून निधी आणल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द अजित पवारांनी दिला.

‘मूळ पवार अन् बाहेरुन आलेले पवार’; ‘सूनेला निवडून द्या’ म्हणणाऱ्या अजितदादांना टोला 

अठरा पगड जातींना फक्त मोदीच न्याय देणार
आता होणारी निवडणूक ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. १४० कोटी जनतेचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशातल्या राजकीय पक्षांकडे आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडे नजर टाकली तर देश आणि अठरा पगड जातींना न्याय देण्याचं काम फक्त पंतप्रधान मोदीचं करू शकतात, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, मीही कधीकाही मोदींना विरोध केला. पण, त्याचं काम पाहून आज त्यांच्यासोबत उभा आहे. त्यांनी दहा वर्षात जे काही निर्णय घेतले, ते भारतमातेसाठी घेतले. आज कोणतेही शत्रू राष्ट्रे भारताकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही, असंही अजित पवार म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=517moLwSses

शिवतारेंविषयी अजित पवार काय बोलले? 
अजित पवार म्हणाले, जेव्हा विजय शिवतारे भूमिका मांडतात, तेव्हा ते समोरच्या सळो की पळो करतात. मागचा पुढचा विचार करत नाहीत. मी त्यांचं शत्रुत्व पाहिलं आहे. आता ते आमच्यासोबत आहेत. वर्षावर झालेल्या बैठकीत त्यांनी हातात घेऊन त्यांनी सांगितलं, तुम्ही माझं शत्रुत्व पाहिलं, आता मैत्री काय आहेत, ते दाखवतो… मीही आज शब्द देतो, गुंजणीचं पाणी पुरंदरला देणार. काहीतरी थातूर मातूर सांगायचं अन् लोकांची दिशाभूल करायची ही आमची पद्धत नाही, असही अजित पवार म्हणाले.

follow us