‘मूळ पवार अन् बाहेरुन आलेले पवार’; ‘सूनेला निवडून द्या’ म्हणणाऱ्या अजितदादांना टोला
Sharad Pawar On Ajit Pawar : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) निवडून द्या असं आवाहन केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अक्षय आणि टायगरच्या ‘BMCM’वर पैशांचा पाऊस, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार धमाका
शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी बाहेरुन आलेले पवार असा उल्लेख करताच पत्रकार परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सोबतच शरद पवार यांनाही हसू आवरलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे.
आधी ईडी आता सीबीआय! BRS नेत्या के. कविता पुन्हा गजाआड; कोणत्या प्रकरणात अटक?
अजित पवार यांनी काय आवाहन केलं?
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमदेवारी देण्यात आली आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच सुनेत्रा पवारांसाठी महायुतीकडून बारामतीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत बारामतीकरांनी शरद पवारसाहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी आता सुनेला निवडून द्या, आत्तापर्यंत पवारांच्या मागे बारामतीकर उभे राहिलेले आहेत, त्यामुळे सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.
दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्वच पक्षांच्या सभांचा जोरदार धडाका सुरु आहे. त्यात बारामीत मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे.