Download App

Video : पंचाहत्तरी पूर्ण करताच मोदी मोठा गेम करणार; ठाकरे अन् शाहंचं नाव घेत केजरीवालांचा दावा

तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी प्रथमच पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर मोठा गेम करणार असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. जर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यंदाची लोकसभा निवडणूक जिंकली तर दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदलले जातील. एवढेच नव्हे तर, मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मोदी अमित शहांना पंतप्रधान बनवतील. त्यासाठीच यंदाच्या निवडणुकीत मोदीजी स्वत:साठी मते मागत नसून, ते अमित शहांसाठी मते मागत आहेत असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (दि.11) पत्रकार परिषदेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ( Amit Shah Will Be the Next PM Arvind Kejriwal Big Statement In Delhi )

Video : धनुभाऊ, पंकजांच्या बीडमध्ये अजितदादांचा हिरमोड; भाषणाला उभं राहताच व्यक्त केली नाराजी

केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे. त्यांनी ही निवडणूक जिंकली तर काही दिवसांनी ममता दीदी, तेजस्वी यादव, स्टॅलिन, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरे हे तुरुंगात असतील. भाजपच्या अनेक नेत्यांचे राजकारण त्यांनी संपवले. ही हुकूमशाही आहे. पंतप्रधान मोदींनी अतिशय धोकादायक मिशन सुरू केले आहे. ‘वन नेशन वन लीडर’ असे त्या मिशनचे नाव आहे.

वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..

मोदींनी भाजपच्या अनेक नेत्यांचे राजकारण संपवले

पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, मोदींनी अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांची राजकीय कारकिर्द संपवली आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत विजयी झालेल्या शिवराजसिंह चौहान यांना त्यांनी मुख्यमंत्री केले नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण संपल्यात जमा आहे. वसुंधरा राजे, खट्टर, रमण सिंह यांचे राजकारण संपुष्टात आले असून, आता पुढची पाळी योगी आदित्यनाथ यांची आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा जर मोदी जिंकले तर, योगीजींची कारकीर्दही संपुष्टात येईल.

follow us