मोठी बातमी : केजरीवालांना अखेर अंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ

  • Written By: Published:
मोठी बातमी : केजरीवालांना अखेर अंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना निवडणुकांच्या धामधुमीत दिलासा मिळाला असून, सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.10) अंतरिम जामीन मंजूर करत केजरीवालांना 1 जूनपर्यंत जामीन दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दिल्लीत 25 मे रोजी लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. याआधी केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने प्रचाराच्या धामधुमीत आपच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी बळ मिळण्यास मदत होणार आहे. ( Arvin Kejriwal Gets Interim Bail Till 1st June)

यापूर्वी मंगळवारी (दि.7) सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालायाने निकाल राखून ठेवला होता. तर, दुसरीकडे याच प्रकरणात दिल्ली न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ करण्याचे निर्देश दिले होते. तत्पूर्वी ईडीने गुरूवारी (दि.9) प्रतिज्ञापत्र दाखल करून केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास जोरदार विरोध केला होता. केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे योग्य होणार नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

Video : महाराष्ट्रातून पाठ फिरत नाही तोच, मोदींच्या ऑफरवर पवारांचा कारणासह पूर्णविराम

केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली होती

दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांवर दिल्ली दारू धोरणाद्वारे काही लोकांना फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने केजरीवाल यांनी ईडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच जामीनासाठी अर्ज केला होता. प्रचारसभा घेण्यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मिळावा, असी मागणी करणारा अर्ज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube