“सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचा पराभव करा”; केजरीवालांचा उल्लेख करत पवारांचा मोदींवर हल्लाबोल

“सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचा पराभव करा”; केजरीवालांचा उल्लेख करत पवारांचा मोदींवर हल्लाबोल

Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : सत्तेचा वापर मोदी परिवर्तनासाठी करतील असं वाटत होतं. पण, प्रत्यक्षात काय घडलं. ते राज्य हव्या त्या पद्धतीने चालवण्यासाठी त्यांनी हातात घेतलं. या सरकारने अनेक निर्णय घेतले. पण ते सामान्यांच्या हिताचे नाहीत. झारखंड राज्यात आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. पण, मोदींनी ते राज्य हातात घेतलं. मुख्यमंत्र्यांना बाजूला काढलं. दिल्लीत अरविंद केजरीवाल चांगलं काम करत होते. दिल्लीकरही खूश होतं. पण त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर ते आज तुरुंगात आहेत. अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याचं काम या सरकारकडून होत आहे. याला उत्तर म्हणजे आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त भोर येथील आर. आर. हायस्कूल मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले, सुप्रिया सुळेंना आणखी एक संधी द्या. मी आज येथे तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे. मी विनंती करतो की सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा.

 Sharad Pawar: ..तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज