Bachchu Kadu Support Shyam Kumar Barve : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहारने मविआला पुरक भूमिका घेतली. अमरावती येथे भाजपने नवनीत राणांना (Navneet Rana) उमेदवारी दिल्याने बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. त्यानंतर आता त्यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिला.
मी आता आणि भविष्यातही पवारांसोबतच; वडिलांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर रोहिणी खडसेंचे स्पष्टीकरण
नवनीत राणा यांना शह देण्यासाठी बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आता त्यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला. एकप्रकारे भाजपशी जुळवून घ्यायचं नाही, असा संदेश कडू यांनी दिला.
प्रहारच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची रामटेक येथे २ एप्रिल रोजी बैठक झाली. बच्चू कडू यांना महायुतीत मान नाही. राणा दाम्पत्याने बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्याच नवनीत राणांना भाजपने अमरावतीतून उमेदवारी देऊन प्रहार कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, अशी नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात, ८ दिवसांत…; शिरसाटांचा दावा
यानंतर नागपूर जिल्हाप्रमुख रमेश कारेमोरे अमरावतीत जाऊन कडू यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कडू यांच्याशी चर्चा श्यामकुमार बर्वे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका सांगितली. कडू यांनी रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे (Shyam Kumar Barve) यांना पाठिंबा देण्यास संमती दिली. रमेश कारेमोरे यांनी एका माध्यम संस्थेशी बोलतांना सांगितले की, पदाचा गैरवापर करून आणि यंत्रणेवर दबाव टाकून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. मागासवर्गीय महिलांसोबतचे हे षडयंत्र जनतेला मान्य नाही. जनता याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असं कारेमारे यांनी सांगितलं.
दरम्यान, रामटेकमध्ये तिहेरी लढत आहे. महायुतीकडून राजू पारवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे उभे आहेत. तर कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेले किशोर गजभिये यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना वंचितने पाठिंबा दिला आहे. तर श्यामकुमार बर्वेंना बच्चू कडूंनी पाठिंबा दिला.
कडू अकोल्यात काय भूमिका घेणार ?
बच्चू कडू अकोल्यातही कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते उद्या अकोल्यात दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, कडू अकोल्यात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.