Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Election : राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) जागेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP) यांच्यात तिढा निर्माण झाला होता मात्र आता या जागेवर असणारा तिढा सुटला असून नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नाही यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे. या जागेवर असणारा तिढा लवकरच सोडावा लागणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली आहे ते लवकरच नाशिकच्या जागेवर देखील उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, पाचव्या टप्प्यात नाशिकमध्ये निवडणूक होणार आहे असून 20 मे ला मतदान आहे. यामुळे आता खरी निवडणूक दिसेल. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेतील. असं देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भुजबळ जबाबदार नेते आहे
मंत्री छगन भुजबळ नाराज नाही ते महायुतीतील मोठे नेते आहे आणि जबाबदार नेते आहे. ते एका लोकसभेवरून नाराज होणारे नेते नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आपल्या नेत्यांनी लढायला पाहिजे मात्र महायुतीमध्ये जेव्हा निर्णय होतात तेव्हा सर्वांनीच त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे आणि ती आम्ही करत असल्याचं देखील ते म्हणाले. याच बरोबर छगन भुजबळ यांनी महायुतीसाठी विदर्भात खूप प्रचार केला असून पुढे देखील ते महायुतीसाठी प्रचार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे यांचा निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये होणार
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये होणार, त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात पेन बघितला नाही ते अडीच वर्षात फक्त दोनच दिवस विधान मंडळात आले. राज्यातील 14 कोटी जनतेला उद्धव ठाकरेंच्या सरकारचा कोणताही फायदा झाला नाही. त्यांच्या काळात महाराष्ट्र दहा वर्षे मागे आला.
मग तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसले?, भरसभेत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल
त्यांनी राज्याचे नुकसान केले. आज या राज्याच्या प्रत्येक 14 कोटी जनतेमध्ये लायक विकास पुरुष देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल असे नालायक लोक किती बोलले तरी त्याला अर्थ नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.