मग तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसले?, भरसभेत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल
Supriya Sule On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि भ्रष्टाचारावरून सरकारवर जोरदार टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्न देखील विचारला.
तरुणांना आज नोकऱ्या नाही, बाजारात आज डाळींचे भाव वाढत आहे सरकारकडून डाळींचे भाव नियंत्रणात येत नाही. मात्र तरीही देखील सरकार लोकांना खोटे आश्वासन देत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. अजित पवार प्रचार करताना सांगत आहे, बारामती मतदारसंघात विकास झाला नाही, मी त्यांना माझ्या विकास कामाची माहिती देण्यासाठी पुस्तक पाठवलं आहे ते जर त्यांनी वाचले तर ते देखील तुतारीला मतदान करणार असं सुप्रिया सुळे म्हणाले.
तर सभेत भाषण करण्यासाठी त्यांना भाषण कोण लिहून देत आहे आहे हे मला कळत नाही, माझ्यात वाईट गुण आहे असं ते सांगत आहे मात्र जर मी इतकी वाईट आहे तर तुम्ही साडेसतरा वर्ष गप्प का बसले होते? असा सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला.
अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाले, यापूर्वी ते आम्हाला भ्रष्टाचार करणार पक्ष, नॅशनल करप्ट पार्टी म्हणत होते मात्र आता ते पुत्र आणि पुत्रीमुळे पक्ष फुटला असं म्हणत आहे. त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मुक्त केले त्यामुळे मी अमित शहा यांचा धन्यवाद मानते अशी टीका त्यांनी यावेळी अमित शहा यांच्यावर केली. तर बारामती मतदारसंघात 7 मे रोजी तुतारी वाजणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?
नाना पटोले यांनी देखील भाजपवर टीका करत आतापर्यंत 13 मतदारसंघात झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळणार असा विश्वास व्यक्त करत मोदींनी राज्यातील सर्व उद्योग गुजरातला घेऊन गेल्याचे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेत बोलताना केला.