Download App

फडणवीसांनी हनुमंताकडं काय मागितलं?, म्हणाले आमच्यासाठी बुद्धी तर विरोधकांसाठी…

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र जे ते नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यामध्ये सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर जोरदार फटकेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, विरोधक आता टीका करताना एकदम शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. (Loksabha Election) त्यांनी आज नागपूर येथे गवळीपुऱ्यातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला

 

विरोधकांसाठी सूबुद्धी मागितली

यावेळी फडणवीस यांना आपण देवाकडे काय मागितलं असा प्रश्न विचारला असता फडवणीस म्हणाले, बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली. आपल्या राज्यावर, देशावर संकट येतात ती दूर व्हाहीत अशी प्रार्थना केली. तसंच, आमच्यासाठी बुद्धी मागितली तर विरोधकांसाठी सूबुद्धी मागितली अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली.

 

शिव्या देतात तेव्हा तेव्हा मोठा विजय

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतिन यांची उपमा दिली त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, हे सर्वच्या सर्व निराश झालेले लोक आहेत. हे पराभवाच्या हताशेने शिवीगाळ करण्यावर आलेले आहेत. आणि हे जेव्हा जेव्हा मोदींना शिव्या देतात तेव्हा तेव्हा मोठा विजय होतो असा दावाही त्यांनी केला. तसंच, हे जितक्या शिव्या देतील त्यापेक्षा जास्त लोक मंदिरावर प्रेम करणार अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार

 

फक्त तोंडाच्या वाफा

उद्धव ठाकरे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या काळात काय काम केलं असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, तब्बल २५ वर्ष मुंबई महापालिका हातात आहे तिथेही काम नाही. आणि काही काम असेल तर दाखवा. फक्त तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंवर थेट टीका केली.

follow us