Download App

पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणं हे दुर्दैव, जितेंद्र आव्हाड मोदींच्या ‘त्या’ विधानावर संतापले

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांरवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. काल एका सभेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. कॉंग्रेस म्हणतं, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, त्यामुळं देशाची संपत्ती मुस्लिमांना वाटणार, असं वक्तव्य त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोदींवर निशाणा साधला.

बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा 

देशाला सांगण्यासारखं काहीच नसते, तेव्हा भाषणात आपल्या कामाबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवणं हाच पंतप्रधानांचा उद्देश असेल, तर हे देशाचं दुर्दैव आहे, असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं भाषण हे पदाला शोभणारं नक्कीच नव्हतं. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवतांना घुसपेठीया या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते, ते काँग्रेसच्या नावावर ढकलून, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार असं सांगून टाकलं. हे सर्व करतांना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही, असं आव्हाड म्हणाले.

Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या 

पुढं त्यांनी लिहिलं की, जेव्हा देशाला सांगण्यासारखं काहीच नसते, तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचं दुर्दैव आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगागाला जाग येईल, असं वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढवल्या जाणार आहोत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळं पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरवल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली.

देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. संपत्ती एकत्र करून कोणाला वाटणार? याचा अर्थ ज्यांना जास्त मुले आहेत ते त्यांना ही संपत्ती वाटणार, घुसपेठिंयांना वाटणार. शहरी नक्षलवादाचा हा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाही, असं मोदी म्हणाले.

follow us