Download App

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात, राज्यात 11 मतदारसंघात हायव्होल्टेज लढती…

आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.

Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीच्य (Lok Sabha elections) तीन टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडले. आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharshtra) लोकसभेच्या 11 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल 

मतदानादरम्यान राज्यासह देशाच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशच्या सर्व २५, तेलंगणाच्या १७, उत्तर प्रदेशच्या १३, महाराष्ट्राच्या ११, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी ८, बिहारच्या ५, ओडिशा आणि झारखंडच्या प्रत्येकी ४ जागांवर मतदान होणार आहे.

Lok Sabha Election : पैसे वाटपावरून धंगेकरांचा ठिय्या ! पण पोलिसांनी पुरावे नसल्याचे सांगून… 

याशिवाय जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एका जागेसाठीही मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. मतदार नेमके कोणाला मतदान करणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसाठी मतदान
आज महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

शिरूरमध्ये 32 उमेदवार रिंगणात
शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे. शिरूरमध्ये ३२ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत.

लोकशाही वाचवण्यासाठी मतदान आवश्यक – धंगेकर

पुणेकरांनी ऊन, वारा, पाऊस विसरून आज मतदानासाठी बाहेर पडावे. लोकशाही वाचवण्यासाठी मतदान आवश्यक आहे. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.

follow us