Lok Sabha Election : पैसे वाटपावरून धंगेकरांचा ठिय्या ! पण पोलिसांनी पुरावे नसल्याचे सांगून…
Pune Lok Sabha congress candidate ravindra Dhangekar alegation : पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीत पुण्यात जोरदार राजकीय राडा झाला आहे. दोन्ही बाजूने पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muridhar Mohol) यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. त्यानंतर धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याने रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला केले.
आम्ही उज्जल निकमांच्या बाजूने तर कॉंग्रेस-शिवसेना कसाबच्या बाजूने…; फडणवीसांचे टीकास्त्र
परंतु धंगेकर यांनी पैसे वाटपाबाबत पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी पुरावे दिल्यानंतर कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पैसे वाटपाबाबत धंगेकर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी काही जणांना स्थानबद्ध करावे, अशी मागणी केली आहे. परंतु पोलिस असे करू शकत नाही. त्यांनी पुरावे दिल्यानंतर चौकशी करून कारवाई करावी. माध्यमांकडे धंगेकरांनी पुरावे दिले असल्यास ते पुरावे आम्हाला द्यावेत, त्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे.
भाजपही आक्रमक
रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिस आयुक्त यांची भेट घेतली आहे. त्यांच्याबरोबर आमदार माधुरी मिसाळ व इतर कार्यकर्ते होते. रवींद्र धंगेकरांकडून साड्या आणि पैसे वाटप केले जात होते. त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे ते राजकीय ड्रामा करत असल्याचा आरोप मिसाळ यांनी केला आहे. मिसाळ म्हणाले, ते आमदार आहेत. ते ड्रामा, नाटके करून आमदार झाले आहेत. आता पराभवाच्या भितीपोटी पुन्हा त्यांना असे नाटके सुरू केल्याचा आरोप मिसाळ यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल
रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढल्या
सहकारनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार आहे की पैसे वाटप झाल्याची. या तक्रारीची दखल आम्ही घेतली पण या तक्रारीत काही पुरावे सापडले नसल्याने गुन्हा दाखल झाला. धंगेंकर तिथे येऊन ते गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आहेत. पण विनापुरावा कुठला ही गुन्हा दखल करता येत नाही. तिथे ते बसले आहेत आणि बेकायदेशीर पणाने जमाव केला आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ आम्हाला भेटले आम्ही त्यांना देखील समजावले आहे.पुणे शहरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे१४४ लागू आहे. नक्कीच जे बेकायदेशीरपणाने जमाव करेल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. कुठल्या ही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.