Loksabha Election 2024 : देशासह राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये युती आणि आघाडी यांच्यातील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये मात्र अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या उमेदवारासाठी आग्रही मागणी दिसत आहे. यामध्येच नागपूरमधील रामटेक आणि नाशिक मतदारसंघांमध्ये भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय.
नितेश राणे ‘वेडा’ आमदार, पोलिसांनी दुर्लक्ष करावं; आंबेडकरांचा राणेंवर मार्मिक भाष्य…
रामटेक आणि नाशिक हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र रामटेक मधील उमेदवार हा कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असेल असा दावा भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला आहे. तर जागा वाटपामध्ये नाशिकची जागा ही भाजपाला सुटावी अशी मागणी भाजपने पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
‘विरोधकांकडून नुसताच ‘अजित’दादांच्या नावाचा जप’; चाकणकरांनी सुनावलं
त्यावर बोलताना कोहळे म्हणाले की, मी आतापर्यंत अडीच हजार गावांमध्ये प्रवास केला. सर्व मंडळांमध्ये मिळावे घेतले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याला भेटलो आहे .प्रत्येकाचे मत असा आहे की, शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून आम्ही दोनदा मदत केली. आता मात्र एकदा तरी कमळावर निवडून येणारा खासदार आम्हाला पाहिजे, हक्काचा खासदार पाहिजे. अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं कोहळे यांनी सांगितले.
तर नाशिक मतदारसंघा बद्दल बोलताना भाजपचे लोकसभा प्रमुख केदार आहेर यांनी सांगितले की, शिवसेनेचे हेमंत गोडसे हे दोनदा खासदार राहिले आहेत. पण त्या मतदारसंघात संघटनात्मक दृष्टिकोनातून भाजप उजवी आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघ करून भाजप दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.