‘विरोधकांकडून नुसताच ‘अजित’दादांच्या नावाचा जप’; चाकणकरांनी सुनावलं

‘विरोधकांकडून नुसताच ‘अजित’दादांच्या नावाचा जप’; चाकणकरांनी सुनावलं

Rupali Chakankar On Shard Pawar Group : सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि मुंब्रापासून ते जामखेडपर्यंत अजितदादांच्या नावाचा जप करत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जाहीर सभा सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात चाकणकर बोलत होत्या.

श्रेयसने सांगितलं महेश मांजरेकरांसोबतच्या कामाबद्दलचं गुपित; म्हणाला, ‘प्रेक्षकांना कायम…’

यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या, जनतेच्या विकासासाठी अजित पवार यांनी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद, कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर सारखी टीका केली जात आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मुंब्रापासून ते जामखेडपर्यंत अजितदादांच्या नावाच जप करत असल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुनावलं आहे.

Pune Loksabha: उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांचाही उमेदवारीसाठी बड्या नेत्याला फोन

तसेच पूर्वी अजितदादांनी जी कामे केली आहेत. ती आम्ही केली सांगून मते मिळवायची, आता दादांवर टीका करतात आणि मते मिळवतात. याचा अर्थ अजितदादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा चारितार्थ चालत नाही. त्यामुळेच त्यांना अजितदादांचा जप करावा लागत आहे. विरोधकांनी टीका करताना काही मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होतात . प्रत्येक सभेला हजारोंच्या संख्येला लोकं उपस्थित राहतात. मात्र, शेवटच्यावेळी लोकं निघून जातात, तेव्हा चार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढून विरोधक फोटो पोस्ट करतात. तुम्ही जेवढे असे रिकाम्या खुर्त्यांच्या फोटो टाकतात, तेवढेच लोकं तुमच्या बारामतीच्या लोकसभेच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित असतात, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

सोलापूर-पुण्यात मोठी कारवाई; अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या टोळ्या गजाआड

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यव्यापी संविधान गौरव मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. विशेषत: मेळाव्यात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय विभागाचे सुनिल मगरे, यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube