चित्रा वाघांसोबत काम करणार का? रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘आम्ही विचारधारेबरोबर…’

चित्रा वाघांसोबत काम करणार का? रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘आम्ही विचारधारेबरोबर…’

Rupali Chakankar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. या बंडानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकून आपल्यालाच सगळ्या आमदारांचा पाठिंबा आहे, असं सांगितलं. अजित पवारांसोबत अनेक दिग्गज नेते आहेत. रुपाली चाकणकरही (Rupali Chakankar) अजित पवार गटात आहेत. त्यांचे अनेक विषयांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी झालेले वात सर्वश्रृत आहेत. त्या दोघींचा एक सेल्फीही सोशल मीडियावर व्हायरल होतो. आता चाकणकर यांना चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. (Rupali Chakankar On Chitra wagh and sharad pawar)

चाकणकर म्हणाल्या, चित्रा वाघ यांच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या विचारधारेबरोबर काम करतो. समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणारा फोटो दहा वर्षांपूर्वीचा आहे. तो फोटो व्हायरल करून एखाद्याचं घर चालत असेल तर नाईलाज आहे. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विधारधारा घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली आम्ही काम करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चाकणकर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

WC Qualifiers 2023: नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र, स्कॉटलंडला नमवून केला अंतिम दहामध्ये प्रवेश 

यावेळी त्यांनी शरद पवारांना अडचणीत आणणारा प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, असं म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. माझ्या आयुष्याचा उभारीचा काळ मी संघटनेला दिला. मात्र, माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का लावला गेला? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आजही शरद पवारच माझे आदर्श आहेत. तेच आमचे दैवत आहेत आणि राहणार. पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मला अजित पवार यांनी मला दिली. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादीच्या महिला संघटनमुळे असेल, असा विश्वास करत आता अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल. आणि कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरचं असेल असं त्यांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube