Ahmednagar Loksabha : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारसंघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू, अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुरी येथील एका सभेत ते बोलत होते.
24 X 7 फॉर 2047; विकसित भारतासाठी मोदींची वर्ध्यातून जनतेला ठोस गॅरंटी
नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुका ह्या दुस-या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. प्रचारात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थनात ठिकठिकाणी रॅली, सभा होत आहेत. त्यांच्या सभांना वाढणारी गर्दी ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुरी शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Tahir Bhasin: ‘ये काली काली आंखें 2’च्या सिक्वेलद्दल अभिनेता म्हणाला, ‘इंडस्ट्रीतील…’
यावेळी बोलतांना सुजय विखे पाटील म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात आपण केवळ विकास कामांवरच चर्चा केली असून विरोधात कोण? याचा विचार केला नाही आणि कोणावर टीका-टीप्पणीही केली नाही. केवळ गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावरच आपण मैदानात उतरलो असल्याचे विखेंनी सांगितलं.
विरोधकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले
ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास करणे या एकमेव उद्देशाने आपण राजकारणात आलो आहोत, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, जिल्ह्यात विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा आहे. येत्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही, त्यांचे हात भ्रष्टाचाराने भरलेले आहेत. त्यांच्या दहशतीमुळे व्यापारी धास्तावले आहेत. सामान्य जनता वैतागली असतांना केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचं त्यांना खुलं आवाहन आहे, असं विखे म्हणाले.
दरम्यान, मतदारसंघात सुजय विखे यांच्या प्रचार सभांना गर्दी होत आहे. विकासकामांच्या मुद्द्यावर मैदानात उतरलेल्या सुजय विखे पाटील यांना तरुणांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.