जिसको किसी ने नहीं पूछा, उसको इस गरीब के बेटे ने पूजा है! वर्ध्यातून मोदींची 24 X 7 फॉर 2047 गॅरंटी

  • Written By: Published:
जिसको किसी ने नहीं पूछा, उसको इस गरीब के बेटे ने पूजा है! वर्ध्यातून मोदींची 24 X 7 फॉर 2047 गॅरंटी

वर्धा : लोकसेभा निवडणुकांसाठी देशभारातील विविध भागात जोरदार प्रचार सभा घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.19) वर्ध्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत उपस्थितांना आपण 24 सातही दिवस 2047 साठी काम करत असल्याची गॅरंटी दिली. यावेळी त्यांनी विकसनशिल भारताचं स्वप्न दूर नसल्याचंही सांगितलं. “माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे तीन अक्षरांचा खेळ नाही, तर, ही गॅरंटी पूर्ण करण्यासाठी माझा प्रत्येक क्षण घालवायचा आहे. 2047 साठी मी  24/7 काम करत असल्याचे मोदी म्हणाले.

वर्धा येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “2014 पूर्वी देशात काहीही चांगले होऊ शकत नाही, असा समज होता. सगळीकडे निराशा होती. गावकऱ्यांना वाटायचे की पाणी, रस्ते आणि वीज कधीच आपल्या गावात पोहोचू शकत नाही असे वाटत होते. पण ‘जिसको किसी ने नहीं पूछा, उसको इस गरीब के बेटे ने पूजा है’…” असेही मोदी यावेळी म्हणाले.

पुढे सभेला संबोधित करताना मोदी म्हणाली की, आम्ही समस्या सोडवण्यासाठी तसेच शक्यता निर्माण करण्यासाठी काम करत आहोत.  वर्धा आणि अमरावतीतील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत अमरावतीची संत्री आणि वर्ध्याच्या हळदीला स्वतंत्रपणे ओळख आम्ही दिल्याचे मोदी म्हणाले. विरोधी पक्षावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी देशद्रोही आणि शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे अनेक दशके देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईटच राहिली. कुटुंबाच्या नावावर नेम अचूक लागत होता. परंतु, अनेक पिढ्या उलटल्यानंतरही देशातील नागरिकांची कामं काही केल्या पूर्ण झालेली नाही. काँग्रेस आघाडीच्या कामकाजासाठी मराठीत एक म्हण आहे, बारशाला गेला आणि बाराव्याला आला… असे म्हणत मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर बोचरा वार केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube