Tahir Bhasin: ‘ये काली काली आंखें 2’च्या सिक्वेलद्दल अभिनेता म्हणाला, ‘इंडस्ट्रीतील…’

Tahir Bhasin: ‘ये काली काली आंखें 2’च्या सिक्वेलद्दल अभिनेता म्हणाला, ‘इंडस्ट्रीतील…’

Tahir Bhasin On Yeh Kali Kali Aankhen 2: नेटफ्लिक्सने (Netflix) नुकतीच त्यांच्या स्मॅश-हिट मालिका ये काली काली आंखेच्या सिक्वेल बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आला. मुख्य अभिनेता ताहिर राज भसीन (Tahir Bhasin) याने बहुप्रतीक्षित मालिकेच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या सीझनच्या घोषणेवर आपला उत्साह व्यक्त केला आहे. जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या पहिल्या सीझनच्या जबरदस्त यशासह, ताहिर राज भसीन त्याच्या उत्तुंग कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. यानिमित्ताने त्यांनी आपला अनोखा प्रवास आणि वर्षानुवर्षे मिळालेले प्रेम याबद्दल भाष्य करताना दिसले आहे.

अभिनेत्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी आणि पडद्यावरील जबरदस्त प्रेजेंससाठी ओळखला जाणारा, ताहिर एक अभिनेता म्हणून उदयास आला आहे, जो तीव्र आणि ग्रे शेड अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारताना तो पाहायला मिळत असतो. वैविध्यपूर्ण पात्रांमध्ये जिव टाकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला जगभरातील प्रेक्षकांकडून कायम तोंडभरून कौतुक पाहायला मिळत असतो.

ताहिरने आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे माझे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे वर्ष असणार आहे. त्यामुळे या वाढदिवसासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. नेटफ्लिक्सवरील माझ्या सुपरहिट सीरीजचा सिक्वेल असलेल्या माझ्यासाठी असा एक मोठा प्रोजेक्ट करणे हा वाढदिवस माझ्यासाठी खरोखरच रोमांचित करणारा आहे.

Pravin Tarde: मित्रासाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाला, “चौकातल्या पोराला फिल्मफेअर…”

तो पुढे म्हणाला, “मी ये काली काली आंखेचे शूटिंग करत आहे आणि मला सर्जनशीलतेने खूप समाधान वाटत आहे. मी एक असा अभिनेता आहे ज्याला पडद्यावर सतत स्वत:ला नव्याने आविष्कृत करायचे आहे आणि मी धन्य आहे की त्या नव्या शोधांना इंडस्ट्री, मीडिया तसेच प्रेक्षकांनी पसंत केले आणि त्यांचे कौतुक केले. ये काली काली आंखे हा एक प्रोजेक्ट आहे, जो मला आजही प्रेम देत आहे. माझ्या सोशल मीडियावर या मालिकेबद्दल प्रश्नांचा भडीमार होत असतो.

ताहिर पुढे म्हणाला की, “लोक मला माझ्या वाढदिवसानिमित्त ये काली काली आंखेंमधून काहीतरी नविन अपडेट देण्यासाठी आहेत!ह्या वरुण त्या सीरीज ची अविश्वसनीय यशोगाथा दर्शवते. ताहिरने त्याच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ओलांडला असताना, त्याने एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आणि प्रेक्षकांना त्याच्या कलेने भुरळ घालण्याचा निर्धार केला आहे. ताहिर आता नेटफ्लिक्सच्या ‘ये काली काली आँखे’ या हिट सीरीजच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज