Download App

काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, कॉंग्रेस सोडणार नाही…; आंबेडकरांच्या आरोपाला सुशीलकुमार शिंदेंचं प्रत्युत्तर

आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो, आम्ही काँग्रेस बिलकुल सोडणार नसल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

Sushilkumar Shinde on Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोलापूरच्या सभेत मोठा दावा केला आहे. निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) आणि प्रणिती शिंदे भाजपमध्ये (BJP)प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यावर आता खुद्द कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं.

सोलापुरात मोठी दुर्घटना, स्मार्ट सिटीसाठी ठेवलेल्या पाईपांना भीषण आग; लाखोंचे नुकसान 

आज सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जन्मलो, इथेच वाढलो, इथेच खेळलो, आम्ही काँग्रेस बिलकुल सोडणार नसल्याचं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

T20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ जाहीर; टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा पत्ता कट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले की, हे त्यांचं कामच आहे. त्यामुळे विश्वास ठेवण्याचे कारण नाही. उद्धव ठाकरेंचं महत्व त्यांच्या लक्षात आल्याचं दिसतं, असंही शिंदे म्हणाले.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेलत्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला. त्यांच्या प्रचार सभेत बोलतांना आंबेडकर म्हणाले की, कॉंग्रेसने देशभरात तुम्ही एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपची जी लाईन आहे, त्यावरच कॉंग्रेस जात आहे. तसंच सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. निवडणूक होताच भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होईल, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता. मात्र, आम्ही काँकाँग्रेस कधीही सोडणार नसल्याची भूमिका सुशीलकुमार शिंदे घेतली.

follow us