Download App

Loksabha Election : पुन्हा भाजपच ! पण 370 जागांची ‘गॅरंटी फेल’ होणार?

  • Written By: Last Updated:

ABP Cvoter Opinion Poll: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीने लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दोन्हीकडून उमेदवारही जाहीर होतायत. उद्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच निवडणूकपूर्व काही सर्वे येत आहेत. एबीपी व सी व्होटरचा ओपिनियन पोलनुसार (ABP Cvoter Opinion Poll) तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सरकार येणार आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. परंतु 370 जागा जिंकण्याचा भाजपचा नारा मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. एनडीए आघाडीला चारशे जागा मिळणार नाहीत. तसेच केवळ भाजपला 370 पेक्षा कमी जागा मिळतील, असे ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले, विक्रम कुमार यांच्यावर एमएमआरडीएची जबाबदारी

ओपिनियन पोलनुसार एनडीए आघाडीला 366 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यात टीडीएस आणि जनसेना पार्टीला 17, जेडीयू आणि एलजेपीला 15, जेडीएसला दोन, एजेपीला तीन, आजसू पार्टी 1, एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला प्रत्येकी सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनपीपी, एनडीपीपी, एसकेएमला प्रत्येकी आणि अपना दलला दोन जागा मिळतील, असे पोलमध्ये म्हटले आहे. तर इंडिया आघाडीला केवळ 156 जागा मिळतली. तर इतरांना 21 जागा मिळतील असा पोलचा अंदाज आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा गेम कोणी केला…?

कुणाला किती मते ?

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला सर्वाधिक 46 टक्के मते मिळू शकतात. कमी जागा दाखविलेल्या इंडिया आघाडीला मते मात्र चांगले मिळू शकतात. इंडिया आघाडीला 39 टक्के मते मिळू शकतात. दोन्ही आघाडीची तुलना केल्यास मतांचा फरक हा सात टक्के इतकाच असणार आहे. तर इतरांना 15 टक्के मिळू शकतात.

बंगालमध्ये टक्कर

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) व भाजपमध्ये जोरदार चुरस होणार आहे. टीएमसीला 42 टक्के, एनडीएला 41 टक्के मते मिळू शकतात. इंडिया आघाडीचे मात्र पानिपत होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला केवळ सात टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात एनडीए आघाडीला सर्वाधिक जागा

महाराष्ट्रात एनडीए आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस असणार आहे. पण भाजप, शिवसेना (शिवसेना) व राष्ट्रवादी (अजित पवार) या एनडीए आघाडीला 28 जागा मिळू शकतात. पण राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात.

follow us