Devendra Fadnavis on Uttam Jankar : माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyashil Mohite Patil) आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या रूपाने भाजपला (BJP) मोठे धक्के बसले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आता तुमच्याकडचे काही पोपट बोलायला लागलेत. पण, ज्यांनी माझ्याशी विश्वास घात केला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसंच आताही होईल, अशा शब्दात फडणवीसांनी मोहित पोटील आणि जानकरांवर टीकास्त्र डागलं.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी मोहोर, ऑलम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाला नमवलं
माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करतांना फडणवीस म्हणाले, काही पोपटही बोलू लागले आहेत. तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं. माझ्याकडे विमानातून घेऊन आलात. आता ते अजितदादांबद्दल बोलतात आणि कोणाबद्दल बोलतात. रातोरात त्यांना वाटू लागलं की, ते राष्ट्रीय नेते झाले. ते राष्ट्रीय नेत्यांसारखे बोलू लागले. पवारांनी बाजूला सारल्यानंतर मोहिते पाटील माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांचे पुनर्वसन केले. आता परतफेट करण्याची वेळ आली तर ते सोडून गेले. पुन्हा पवारांची साथ दिली. आता जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही, माझ्याशी विश्वासघात केली की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
एचडी देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, एसआयटी स्थापन होतोच देशातून फरार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, परतफेड करण्याची वेळ आल्यावर त्यांनी पवार साहेबांचा हात धरला. पण हे लक्षात ठेवा, लोकांच्या मनात मोदीजी आहेत. त्यामुळे कोणी कितीही विश्वासघात केला, तरी जनता विकासकामाला जागून निंबाळकरांना निवडून देईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
पवारांना जे जमले नाही ते निंबाळकरांनी पाच वर्षांत करून दाखवले. याचाच राग पवारांना आहे. आता रणजित नाईक निंबाळकर पुन्हा निवडून आले तर त्यांची सर्व दुकानदारी बंद होतील, अशी भीती पवार आणि मोहिते पाटलांना आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.