Sanjay Gaikwad On Ravikant Tupkar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha elections) आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातत आता बुलडाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शेतकरी नेते आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर जोरदार टीका केली. तुझी शिकार नक्की करणार, असा इशारा त्यांनी दिला.
.. तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार, वचननाम्यात ठाकरे गटाकडून भाजपवर हल्ला
काल शेगावमध्ये झालेल्या सभेत बोलतांना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. त्या टीकेला आता संजय गायकवाडांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. गायकवाड म्हणाले, वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली. मी वाघासारखाच जगलो. तुझी शिकार केल्याशिवाय मी राहत नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला. ते म्हणाले, गेल्यावेळी पाय पकडले, मला धोका आहे, असं सांगून राजू शेट्टींना घेऊन आला. आता शेट्टी येऊ दे नाहीतर कोणीही येऊ दे, तुझी जागा तुला दाखवणारच आहे, अशी धमकी गायकवाडांनी तुपकरांना दिली.
मोदी-शाहांना महाराष्ट्राविषयी आकस, ते तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत? ठाकरेंचा सवाल
नेमकं तुपकर काय म्हणाले?
तुपकरांनी काल शेवगामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
माझ्या नादाला लागू नका. प्रतापरावांना सांगतो, माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर ईट का जवाब पत्थर से देंगे. मला बदनाम करण्यासाठी खोटे व्हिडिओ व्हायरल करतात. तुम्हाला काय बोलायचे आहे ते माझ्यावर बोला. विकासाच्या धोरणावर बोला. माझ्या आई-वडिला, पत्नीसह चार वर्षाच्या मुलावर घाणेरडे आरोप कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा तुपकर यांनी दिला. आमदार गायकवाडांनी एका महिलेची जमीन बळकावल्याचा उल्लेखही तुपकरांनी केला होता.
दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. गायकवाडांनी तुपकर यांच्या शिकाराची भाषा केल्यानं आता तुपकर गायकवाडांना काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.