Download App

Lok Sabha elections : राज्यात मतदानाचा टक्का घटला! फटका कुणाला बसणार?

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.

  • Written By: Last Updated:

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्यात मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील पाच मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.

तरुणाने ईव्हीएम मशीनवर घातला कुऱ्हाडीचा घाव! म्हणला, संविधान वाचवण्यासाठी… 

आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. शांततेत मतदान व्हावे यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, दिवसभरात फारच कमी मतदान झाले आहे.

पंतप्रधान मोदी घाबरले, त्यांच्या डोळ्यातून स्टेजवर अश्रू येतील, राहुल गांधींनी लावला टोला 

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?
वर्धा- ५६.६६ टक्के
अकोला- ५२.४९ टक्के
अमरावती- ५४.५० टक्के
बुलढाणा- ५२.२४ टक्के
हिंगोली- ५२.०३ टक्के
नांदेड- ५२.४७ टक्के
परभणी- ५३.७९ टक्के
यवतमाळ-वाशिम- ५४.०४ टक्के

यवतमाळ-वाशीममधून राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात थेट लढत आहे. तर अमरावतीत नवनीत राणा आणि दिनेश बूब यांच्यात चुरस आहे. पण, मतदार राजाने मतदानाकडे पाठ फिरवल्याने निवडून येणारे उमेदवार फारच कमी फरकाने निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये धाकधुक वाढली आहे.

दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारनंतर मतदान मतदान केंद्रावर फिरकतील अशी शक्यता होती. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी केवळ 43 टक्के मतदान झाले होते. मात्र, पाच वाजेपर्यंतही केवळ पन्नास टक्केच मतदान झाले.

गेल्या निवडणुकीत कसा होता मतदानाचा टक्का ? 

गेल्या निवडणुकीत यवतमाळ-वाशीममध्ये सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. नांदेडमध्ये 60.88 टक्के मतदान झाले होते. तर अकोल्यात 54.45 टक्के, परभणमध्ये 62.54 टक्के, बुलडाणा 57 टक्के, अमरावती 55 टक्के, हिंगोलीत 61 टक्के, नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झाले होतो.

नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडली?
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर घटना घडली. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात घुसून व्हीव्हीपीएटी मशीन व बॅलेट मशीन कुऱ्हाडीने फोडली. त्या व्यक्तीने मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.

 

follow us