Bajrang Sonawane on Pankaja Munde : आतापर्यंत जे जिल्ह्याचे मागासलेपण घालवू शकले नाहीत, तेच विकासाच्या बाता मारत आहे. त्यांच्या वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane ) यांनी मुंडे बंधू-भगिनींवर केली.
Mumbai Airport : मोठी बातमी, मुंबई विमानतळावर 15 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. आज बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये सभा झाली. या सभेला शरद पवार, जयंत पाटील, रणनीताई पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना बजरंग सोनवणेंनी पंकजा मंडेंवर जोरदार निशाणा साधला. वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली. आम्हाला ऊसाचे बील दिले नाही, असं प्रत्येक गावातील शेतकरी सांगत आहे. मुकादमांचे पैसे दिले नाहीत. कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुटले, अशी टीका सोनवणेंनी केली.
SBI Recruitment : स्टेट बॅंकेची मोठी घोषणा! 12 हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती..
परळीच्या नगरपालिकेत फक्त कागदावरच विकास केला केला. तुम्ही बीड जिह्याचं मागासलेपण घालवू शकले नाहीत. अशा लोकांना आमची लायकी काढण्याचा अधिकार नाही, असंही सोनवणे म्हणाले.
खासदार झाल्यानंतर पंकजा मुंडे बीड जिल्ह्याचा विकास करतील, मोदी साहेबांच्या खांद्याला खादा लावून काम करतील. विकासाची गंगा जिल्ह्यात आणतील, असं धनंजय मुंडे सांगत आहेत. पण, गेल्या कित्येक दिवस तुमचा खासदार आहे, पालकमंत्रीपदही तुमच्याच घरात आहे, केंद्रातही आणि राज्यातही तुमचंचं सरकार आहे. मग का विकास झाला नाही? मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं? कार्यसम्राट खासदार प्रीतम मुंडे फंडाचा निधीही खर्च करू शकले नाहीत, असा टोला सोनवणेंनी लगावला.
प्रीतम मुंडे खासदार असताना धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षणावर कधीच सभागृहात आवाज उठवला नाही, असंही सोनवणे म्हणाले.
अंबाजोगाईला रेल्वे आणायची त्यासाठी पंकजा मुंडे खासदार पाहिजेत, असं धनंजय मुंडे सांगत असतात. आमच्या जन्मापासून रेल्वेचं राजकारण सुरू आहे. अद्याप तुम्हाला अंबाजोगाईला रेल्वे आणता आली नाही,आणखी किती दिवस रेल्वेवरून राजकारण करणार? असा सवाल सोनवणेंनी केला.