SBI Recruitment : स्टेट बॅंकेची मोठी घोषणा! 12 हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती..

SBI Recruitment : स्टेट बॅंकेची मोठी घोषणा! 12 हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती..

SBI Recruitment : भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून 12 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा (SBI Recruitment) करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना आयटीसह विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. बॅंकेच्या विविध शाखांसह आयटी विभागात या कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती स्टेट बॅंकेचे चेअरमन दिनेश खारा (Dinesh khara) यांनी याबाबत माहिती दिलीयं.

4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र

देशातील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बॅंकेत 2023-2024 या अर्थिक वर्षाच्या शेवटी बॅंकेत 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते. ही कर्मचाऱ्यांची संख्या 2022-23 या अर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी आहे. बॅंकेत जवळपास 11 ते 12 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरु असून आमच्या कार्यप्रणालीमध्ये अधिकारी पदाच्या स्तरावर जवळपास 85 टक्के अभियंता आहेत. या अर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बॅंकेचा नफा 24 टक्क्यांनी वाढून 20 हजार 698 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचीही माहिती खारा यांनी दिलीयं.

लोकसभेला आय लव्ह यू, विधानसभेला आय हेट यू, गुलाबरावांची फटकेबाजी

नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतरच त्यांची विविध शाखांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना आयटी विभागात नियुक्ती देण्यात येणार आहे.

दरम्यान, बॅंकेकडून 2023-24 या अर्थिक वर्षातील इक्विटी शेअरवरील 13.70 रुपयांच्या लाभांशाची घोषणा केलीयं. 31 मार्च 2024 ला एक वर्षाआधी डिव्हीडंट 0.67 टक्क्याने कमी होऊन 0.57 टक्क्यांवर आला होता. मात्र, चौथ्या तिमाहीत एक वर्षाआधी 1.06 लाख कोटी रुपयांनी वाढून 1.25 लाख कोटींवर पोहोचला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज