Download App

मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष

मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.

  • Written By: Last Updated:

माढा : येत्या 7 मे रोजी राज्यात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून, काल (दि.29) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) जाहीर सभा पार पडली. त्यानंतर आज सर्वांचे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोदींनी जाहीर सभा पार पडली. यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsing Naik Nibalkar) यांच्यासाठी मोदींनी खास शैलीत भाषण करत विजयासाठी विशेष डाव टाकला आहे. मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे. (PM Modi Rally In Madha Loksabha Constitution )

Modi Pune Speech : पुणे जिल्ह्यात NDA चौकार मारणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ग्वाही

माळशिरसमधील सभेसाठी मोदींनी धनगरसमाजाच पेहराव करून उपस्थिती दर्शवली. मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि मराठीतून भाषणाने केली. मोदींनी यावेळी येळकोट येळकोट आणि बाळूमामांच्या नावाचा जयघोष केला. मोदींच्या या खास जयघोषाने मोदींनी धनगर समाजाच्या काळजात हात घातल वोटबँक फिक्स केली आहे. यावेळी मोदींनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर आणि मांढेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होत असल्याचे सांगत उपस्थितांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आहे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची असून, वारकरी संप्रदाय आणि अनेक संतांचे आशीर्वाद आपल्या मस्तकावर आहे. या सर्वांच्या प्रेरणेनेच मोदी विकासित भारतासाठी आपल्या सर्वांकडून आशिर्वाद मागण्यासाठी आल्याचे मोदी म्हणाले.

Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी

उपस्थितांची मागितली माफी

यावेळी मोदींनी उपस्थितांची माफीदेखील मागितली. माफी मागताना मोदी म्हणाले की, देशातील राजकीय नेत्यांनी अशी सवय लावली आहे की, सभा जर 11 वाजता असेल तर नेते एक वाजता येतील. जनतेलाही याची सवय झाली आहे. पण, माझी अडचण वेगळी आहे. मी सभास्थळ वेळेवर दाखल होतो. यामुळे अनेक नागरिकांवर अन्याय होतो. मी दाखल झाल्यापासून सभास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होत आहेत. परंतु, मी त्यांना माझ्यामनातील भावना सांगू शकणार नाही. कारण गर्दीमुळे अनेकजण वेळेत सभास्थळी दाखल होऊ शकणार नाही. पुढील सभासाठी जायचे असल्याने मी माझे भाषण संपवून निघून जाईल त्यामुळे ज्यांना माझे भाषण ऐकणे शक्य झाले नाही त्यांची मी आधीच माफी मागतो.

भावनिकतेला हात अन् माफी मागत मोदींनी सेफ केले अनेक मतदार

मोदींनी माळशिरसमध्ये विकासाच्या मुद्यावर बोलताना काँग्रसच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, ज्या पद्धतीने मोदींनी पेहराव केला होता. तो बघता आणि संताचा उल्लेख करत भाषणाला सुरूवात केली. तसेच वेळेवर येतो म्हणून अनेकांना माझे भाषण ऐकता येत नाही. त्यामुळे त्यांचे येण्याजाण्याचे कष्ट वाया जातात यासाठी मोदींनी उपस्थितांसह जे वेळेवर सभास्थळी दाखल होऊ शकले नाहीत त्यांची जाहीर माफी मागितली. त्यामुळे मोदींनी ज्याप्रमाणे माळशिरसच्या सभेत उपस्थितांच्या भावनिकतेला हात घालत जाहीर माफी मागितली आहे ते बघता मोदींनी स्वतःसह नाईक निंबाळकरांच्या विजयासाठी लाखो मतदारांचे मत सेफ करून घेतले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

माढा लोकसभेची निवडणूक सोपीच; चंद्रकांत पाटलांनी मांडले संपूर्ण गणित

महाराष्ट्रातील जनता कसर सोडत नाही पण…

यावेळी मोदींनी विरोधकांना इशारा देत सांगितले की, महाराष्ट्रातील जनता जेव्हा प्रेम देते, आशीर्वाद देते तेव्हा काहीच कसर सोडत नाही, भरभरून देते. पण जर कोणी आपलं वचन पूर्ण केलं नाही तर हीच महाराष्ट्राची जनता तेही बरोबर लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर त्याचा हिशोब व्यवस्थित चुकता करते, असे मोदींनी विरोधकांना इशारा देत सांगितले.

 

follow us

वेब स्टोरीज