Download App

महायुतीचे जागावापट अजूनही रखडले, ४ जागांचा तिढा सोडवण्यासाठी पहाटे ३ वाजेपर्यंत बैठका

  • Written By: Last Updated:

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, महायुतीत (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये एकूण 4 जागांवरून रस्सीखेच दिसत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठका सुरू आहेत.

Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट 

सत्ताधारी भाजप, अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात कोण उमदेवार असेल यावर एकमत होत नसल्यानं छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या जागेवर भाजप दावा करत आहे. तर दुसरीकडे, शिंदेसेनाही ही जागा सोडण्यास तयार नाहीत. शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर, भागवत कराड हे भाजपकडून इच्छुक आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात या जागेबाबत चर्चा झाली. मात्र, अद्यापही या जागेचा तिढा सुटू शकला नाही.

ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर 

महायुतीतील तीनही पक्षांनी धाराशिव लोकसभा जागेवर दावा केला आहे. या जागेवर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर भाजपनेही या जागेवर दावा केला. भाजपकडून निवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे.

नाशिकच्या जागेवर शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष आहे. मुख्यमंत्री शिंदेंनीहेमंत गोडसे यांना काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे आपल्या नावाची थेट दिल्लीत चर्चा झाल्याचा दावा करत आहेत. त्यामुळं नाशिकच्या जागेचा तिढाही सुटू शकला नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग सामंत आग्रही
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे आहे. मात्र, हा हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळं ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडेच राहावी, अशी उदय सामंत यांची भूमिका आहे. उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत या जागेवरून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, भाजप नारायण राणेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली करत आहे.

follow us