शिंदे आणि ठाकरेंच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलं! हातकणंगलेमध्ये रघुनाथदादा पाटील रिंगणात…

Hatkanangale Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत. तसे अनेक इच्छुक निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहेत. आता शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil) यांनी भारतीय जवान किसान पार्टी (Bharatiya Jawan Kisan Party) हातकणंगलेसह नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. रघुनाथदादा पाटील हे स्वत: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार […]

Raghunathdada Patil

Raghunathdada Patil

Hatkanangale Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत. तसे अनेक इच्छुक निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहेत. आता शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil) यांनी भारतीय जवान किसान पार्टी (Bharatiya Jawan Kisan Party) हातकणंगलेसह नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. रघुनाथदादा पाटील हे स्वत: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Government Schemes : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल? 

गेल्या एक वर्षापासून भारत राष्ट्र समिती पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पाटील यांनी आज (गुरुवार) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे सांगितलं.

यावेळी बोलतांनी त्यांनी भाजपसह त्यांचे जुने सहकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. या लोकसभा निवडणुकीत भाजपला 200 जागांचा टप्पा ओलांडता येणार नाही. कारण भाजपच्या कारभारावर सर्वसामान्य जनता नाराज आहे, असं पाटील म्हणाले. तर गेल्या हंगामातील ऊस दरवाढीवरून केलेले आंदोलन निरर्थक असल्याची टीका त्यांनी शेट्टी यांच्यावर केली.

‘नवरा-बायकोच्यामध्ये बोलू नका’; नवनीत राणांनी बावनकुळेंना सुनावलं 

कोल्हापूर, हातकणंगलेसह नऊ जागांवर भारतीय जवान किसान पक्ष निवडणूक लढवणार असल्याचं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी स्वत: हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे ठाकरे सत्यजित पाटील, स्वाभिमानी किसान संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचितमधून दादागौडा पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तसेच आता रघुनाथदादा पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने या जागेवर एकूण ५ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..

Exit mobile version