Download App

रक्षा खडसेंविरोधात शरद पवारांनी उमेदवार शोधला ! श्रीराम पाटलांवर उद्या होणार शिक्कामोर्तब?

  • Written By: Last Updated:

Shriram Patil Will Contest Raver Lok Sabha constituency: Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha constituency) भाजपच्या खासदार रक्षा खडसेंविरोधात (Raksha Khadse) शरद पवार गटाची उमेदवार शोध मोहीम अखेर संपली आहे. या जागेवर चार जणांच्या नावाचा चर्चा होती. त्यातील एका नावावर एकमत झाले आहे. येथून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना शरद पवार गटाकडून तिकीट देण्याचे नक्की झाली आहे. त्यांची नाव अधिकृतपणे उद्या जाहीर होणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात रक्षा खडसे यांच्याविरोधात महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा तयारी शरद पवार गटाकडून होती. परंतु रोहिणी खडसे यांनी याला नकार दिला. त्यामुळे बारामतीप्रमाणे येथे नणंद-भावजय लढत होऊ शकली. या ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवारांची शोध मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. रावेरचा उमेदवार ठरविण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थित पुण्यात एक बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहिणी खडसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या जागेवर उमेदवार देण्याबाबत तब्बल पाच तास खलबते झाली. त्यात संतोष चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील या चार जणांची नावांवर चर्चा झाली. शेवटी श्रीराम पाटील यांचे नाव नक्की करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नावाची उद्या घोषणा होणार आहे.

Lok sabha : आघाडीच ठरलं ! उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा तगडा नेता मैदानात उतरणार


कोण आहेत श्रीराम पाटील ?

श्रीराम पाटील हे जळगावमधील उद्योजक आहेत. समाजसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. परंतु भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता मावळला होती. त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. परंतु ते आता शरद पवार गटात दाखल होणार आहेत. लोकसभेसाठी तिकीटासाठी सर्व प्रयत्न त्यांचे सुरू होते. त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही.

Sharad Pawar: ‘… तर पाणी मिळणार नाही’ बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी


मागील निवडणुकीतही एेनवेळी माघार

श्रीराम पाटील यांनी मागील लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविले होती. माजी खासदार ईश्वरलाल जैन हे त्यांच्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांनी त्यांना तिकीट देण्याची तयारी दाखविली होती. परंतु तिकीट जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे तेव्हा ते चर्चेत आले होते.

follow us