रक्षा खडसेंनी मतदारसंघात एक रुपयाचेही काम केलं नाही; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

रक्षा खडसेंनी मतदारसंघात एक रुपयाचेही काम केलं नाही; शिंदे गटाच्या आमदाराची टीका

Chandrakant Patil on Raksha Khadse : रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमदेवारी दिली आहे. खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते, अशा शब्दात रक्षा खडसेंना सुनावलं.

वंचितने उमेदवारी देताच रमेश बारसकरांवर मोठी कारवाई! शरद पवार गटाकडून हकालपट्टी 

आज माध्यमांशी बोलतांना पाटील म्हणाले की, आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते कशाला नाराज असते. ग्रामीण भागात काम करत असतांना कार्यकर्त्यांना खासदार-आमदारांचा सपोर्ट हवा असतो. मात्र, खडसेंनी मतदारसंघात एक रुपयाचेही कामे केली नसल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

ते म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याशी माझा तीस वर्षांपासून वैचारिक वाद आहे. त्यात रक्षा खडसेंनी उडी घेतली. त्यांनी महायुतीत असतांना केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून माझ्या विरोधात भूमिका घेतली होती. चंद्रकांत पाटील यांच्यामुळं केळी पिकविम्याला अडचणी आल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीच्या एका खासदारने आपल्याच युतीती असलेल्या आमदारांवर असे आरोप करणं योग्य आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

महायुतीचे जागावापट अजूनही रखडले, ४ जागांचा तिढा सोडवण्यासाठी पहाटे ३ वाजेपर्यंत बैठका 

रक्षा खडसे यांच्यावर मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही, तरीही त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले. त्या ज्या प्रकारे वागल्या असतील त्याचं पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल. जशी त्यांच्या खात्यात शस्त्रे आहेत, तशीच आमच्या खात्यातही शस्त्रे आहेत, असं सांगत पाटील यांनी खडसेंना आव्हान दिलं.

रक्षा खडसे काय म्हणाल्या?
चंद्रकांत पाटील हे महायुतीचे सदस्य असल्याने महायुतीच्या नेत्यांनी त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निवडणूक केवळ रक्षा खडसेंची नसून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे असल्याचे खडसे म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे हे दोन्ही नेते महायुतीचे नेते आहेत. तरीही ते कायम एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतात. आता पाटील यांनी रक्षा खडसेंनी मतदारसंघात त्यांनी एक रुपयाचीही कामे केली नसल्याचा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील रक्षा खडसे यांची नाराजी कशी दूर करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज