Download App

माझं चुकलं पण खरे वारसदार असल्याचं सिद्ध करा; ‘त्या’ वक्तव्यानंतर मंडलिकांचं शाहू महाराजांना आव्हान

Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha elections ) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मंडलिक यांनी आपली चूक कबुल करत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यांनी शाहू महाराजांना आव्हान दिले आहे.

काय म्हणाले संजय मंडलिक?

संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली. त्यामुळे अखेर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मंडलिक म्हणाले की, शाहू महाराजांबाबत बोलताना आपला शब्द चुकला. मात्र शाहू महाराज हेच कोल्हापूकरच्या गादीचे खरे वारसदार असल्याचं शाहू महाराजांनी सिद्ध करावं असं आव्हान देखील यावेळी मंडलिक यांनी दिलं आहे.

स्वतःच्या फायद्यासाठी मुठभर लोकांनी पवार-ठाकरेंकडे कॉंग्रेसला गहाण ठेवलं; विखेंचा थोरातांना टोला

दरम्यान आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं विधान संजय मंडलिक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं कोल्हापूरचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आता प्रचारासाठी जोरदार कंबर कसली. ते सातत्याने शाहू महाराज आणि कॉंग्रेसवर टीका करत आहेत.

विदर्भ, मराठवाड्यात भर उन्हाळ्यात आस्मानी संकट; गारपीट अन् अवकाळीने पीकांचं मोठं नुकसान

अशाच एका प्रचारसभेत बोलतांना संजय मंडलिक यांचा तोल सुटला. मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुध्दा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपल्याचं मंडलिक म्हणाले.

follow us